टेकाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी साजरी
कन्हान : - महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३४६ वी पुण्यतिथी तारखेनुसार टेकाडी गावात शिवप्रेमीच्या वतीने भगवा झेंडे लावुन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार, पुष्प अर्पण करून मानवंदना देऊन पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
शुक्रवार (दि.३) एप्रिल रोजी टेकाडी येथे राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान व्दारे " शिवराय मनामनात, शिवराय घराघरात " या उपक्रमांतर्गत गावात दरवर्षी प्रमाणे शिवरायांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली . हनुमान मंदिर परिसर येथे राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान तर्फे आयोजित पुण्यतिथी सोहळ्यात देवेंद्र सेंगर , सुरेश मोहाडे , वीरेंद्र सिंह , हरिश्चंद्र हूड , अशोक राऊत , शिवशंकर आकोटकर , श्याम आकोटकर आदीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले . याप्रसंगी गणेश मस्के , अनिल कांबळे , श्रीराम डोकरीमारे , राजेश पोटभरे , राजेश मोरे , भुजंग आकोटकर , ग्रा. प. सदस्य तारकेश्वरी मोरे , माजी. ग्रा.प.सदस्य सिंधुताई सातपैसे , सुनिता कांबळे , मोहन शेंदरे , नत्थुजी कांबळे , मनोहर संतापे , अमित इंगळे , आनंद राऊत , प्रज्वल हूड , अमोल राऊत , रामकृष्ण पावडे , संजय वासाडे , प्रणय हूड , राजेश राऊत सह इतर मान्यवर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या