राष्ट्रगीत गावुन तेजस संस्थेने सत्रापुर च्या मुलांना टी-शर्ट आणि बिस्किटे वाटप केले
कन्हान : - तेजस बहुउद्देशिय संस्थे व्दारे सत्रापुर येथील गरजु गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता टी-शर्ट व बिस्किट वाटुन त्यांच्यात शिक्षणा विषयी आवड निर्माण करून त्यांच्या शिक्षणा करिता पर्यंत सुरू करण्यात आले .
After singing the National Anthem, the Tejas organization distributed T-shirts and biscuits to the children of Satrapur.
कन्हान च्या सत्रापुर येथे तेजस संस्थेने लहान मुलांचे बरोबर राष्ट्रगीत गाऊन त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना टी-शर्ट व बिस्किटे वाटुन मानवतेचे कर्तव्य बजावले . अरगुलेवार यांनी सांगित ले की तेजस संस्था कधी ही असे कार्य करत नाही ज्या मुळे आर्थिक नुकसान होईल , तो पैसा गरिबांच्या उन्नतीसाठी त्यांच्या आनंदासाठी वापरला जातो . आमचे प्रत्येक कार्य दिवाळी , ईद , ख्रिसमस सणा सारखे आहे आणि आम्ही आमचा आनंद त्यांच्या सोबत साजरे करतो आमची एक पोळी मध्ये त्यांच्या अर्धी पोळीचा भाग असतो , जर कोणी गाडगे बाबांच्या १० कलमी कार्याकडे जगाचे लक्ष वेधले असेल तर ती केवळ तेजस बहुउद्देशीय संस्था आहे . संस्थेचे दानशुर लोकही आहेत की ते गरिबांच्या उन्नतीसाठी कधीही मागे हटत नाहीत .
नागपुर जिल्ह्यातील सत्रापुर हा असा परिसर आहे . इकडचे लोक शिक्षणाला महत्त्व देत नाहीत कारण त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी खूप संघर्ष करावा लागतो . शिक्षण आणि कोणत्याही आजारावरील उपचार हा एक व्यवसाय बनला आहे . सरकारी शाळा कुठेही दिसत नाहीत आणि गरीब लोक खाजगी शाळांच्या उंबरठ्यावर पाऊलही ठेवु शकत नाहीत . परंतु संस्थेचे उपाध्यक्ष देविदास पेटारे आणि समाजसेवक अर्जुन पात्रे यानी मुलांना शिक्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे . हा संदेश देण्यास आणि या मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी तेजस संस्था व्दारे ही सर्व काही प्रर्यंत सुरू आहे . देविदास पेटारे आणि अर्जुन पात्रे यांनी लवकरच अर्जुन पात्रे यांच्या अंगणात शाळा उघडुन या मुलांना शिक्षित करण्याची प्रतिज्ञा केली आहे . चंद्रशेखर अरगुलेवार संस्थाचे वरिष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ फाले आणि समाजिक कार्यकर्ता वीरू कडी खाये यांनीही आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवुन शाळा उघडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन जनतेला केले आहे .
चंद्रशेखर अरगुलेवार म्हटले की केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मजबुत सरकार आहे . कन्हानचे राजकारणी नेते आणि नागपुर जिल्ह्याचे दमदार पालकमंत्री आहेत . त्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. टी-शर्ट वाटप कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार , उपाध्यक्ष देविदास पेटारे , मार्गदर्शक व पत्रकार एम.ए.जब्बार , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मसार , अर्जुन पात्रे , प्रीतम शेंडे , आशिष इंचुलकर सह नागरिक उपस्थित होते.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या