रेल्वेखाली येऊन २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
मानसिक तणावामुळे टोकाचे पाऊल , पोलीसात आकस्मिक मृत्युची नोंद
कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील कांद्री परिसरात एका 28 वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आली . राकेश देविदीन सूर्यवंशी (वय 28, रा. सुखदेवे कॉलनी, जे.एन. हॉस्पिटलजवळ, कांद्री ता. पारशिवनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार , राकेश हा बेरोजगार असून तो गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली होता . गुरुवार (दि.२६) मार्च रोजी रात्री तो घराजवळील मंदिरात जेवण करून बसला होता . त्यानंतर सुमारे रात्री 10 वाजताच्या सुमारास तो तेथून निघून गेला . रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही .
दरम्यान, शुक्रवारी (दि.२७) मध्यरात्री सुमारास रितेश सूर्यवंशी याने आपल्या काकांना फोन करून राकेशने जे.एन. हॉस्पिटलसमोरील बोर्डा मार्गावरील रेल्वे रुळांवर आत्महत्या केल्याची माहिती दिली . ही माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी धावले असता राकेशचा मृतदेह रेल्वे रुळांवर विखुरलेल्या अवस्थेत आढळून आला . त्याचे शिर एका बाजूस व धड दुसऱ्या बाजूस पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे स्टाफसह घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व पुढील तपासासाठी उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे पाठविला . या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या