जिजाऊ ब्रिगेड व्दारे जागतिक महिला दिवस आणि तालुकास्तरिय अधिवेशन संपन्न
कन्हान : - कन्हान हनुमान नगर समाज भवन येथे जिजाऊ ब्रिगेड कन्हान व्दारे जागतिक महिला दिवस आणि जिजाऊ ब्रिगेड तालुकास्तरिय अधिवेशन विविध कार्यक्रमासह थाटात संपन्न झाले .
जिजाऊ ब्रिगेड कन्हान द्वारे जागतिक महिला दिवस आणि तालुकास्तरिय अधिवेशन समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे आयोजित करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती करुणा आष्टणकर माजी नगराध्यक्षा , उद्घाटक शिवमती सुनिता जिचकार जेष्ठ मार्गदर्शक जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र , प्रमुख अतिथी शिवमती जया देशमुख उपाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र , शिवमती स्वाती शेंडे जिल्हा़ध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नागपुर , आरोग्य तंज्ञ डॉ. सुजाता मानमोडे , प्रतिमा इंगोले पोलीस कॉन्सटेबल , डॉ.स्वाती वैद्य , डॉ.शितल माहुरे , सुनंदा दिवटे , पुनम राठी नगरसेविका नगरपरिषद कन्हान आदीच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
World Women's Day and a Taluka-Level Convention Successfully Concluded by the Jijau Brigade.
पाहुण्या चे स्वागत गीताने व शॉल आणि वृक्ष देऊन स्वागत, सत्कार करण्यात आला . जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा मायाताई इंगोले यांनी प्रास्ताविकातुन महिला दिन आणि तालुकास्तरिय अधिवेशनाचे महत्त स्पष्ट केले . जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रात महिलांचे शिस्तबध्य , न्याय प्रिय आणि मोठे संघटन असल्याचे संबोधित करून जिजाऊ ब्रिगेड मध्ये बहु संख्येने शामिल होण्याचे आवाहन कार्यक्रमाच्या उद्घाटिका सुनिता जिचकार मँडम हयानी केले . प्रमुख अतिथी व मान्यवर महिला तसेच जिजाऊ ब्रिगेड कन्हान सचिव छायाताई नाईक , मार्गदर्शक विशाखा ठमके मँडम आदीनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले .
महिलाकरिता चालण्याची स्पर्धा , रस्सीखेच , संगित खुर्ची आदी विविध स्पर्धा वयोगटा नुसार सत्तर वर्षा पर्यंतच्या महिलांनी सहभाग घेतला होता . सांस्कृतिक स्पर्धेत वेशभुषा , गीत गायन , नुत्य आदी स्पर्धा घेण्यात आल्या . विजेत्या स्पर्धक महिलांना पाहुण्याच्या हस्ते राजमाता जिजाऊ , सावित्रीबाईच्या जिवनावर आधारित मार्गदर्शक पुस्तक बक्षीष म्हणुन देण्यात आल्या . कार्यक्रमास मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता येरपुडे यांनी तर आभार सविता नाटकर हयानी व्यकत केले . सर्वाना अल्पोहार वितरण करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता जिजाऊ ब्रिगेड कन्हान च्या मायाताई भोयर , लताताई जळते , प्रीती कुकडे , अल्का कोल्हे , मनिषा धुळस , वर्षा शिंगाडे , पुष्पा चिखले , लता वंजारी , प्रीती घोटेकर , गोदावरी नागरे , रंजना इगोले , उज्वला लोखंडे , आशा भोंबले , अनुपमा इंगोले , सुनंदा राऊत , सुनिता वाडीभस्मे , सुषमा बांते , मिनाक्षी भोयर , सोनम काकडे , रिना चौबे , प्रमिला वैकार , वर्षा सातपुते , सुरेखा अवचट , संतोष खंडेलवाल , माधुरी सातपुते , श्वेता जाधव , येलकर ताई , चौधरी ताई , विद्या रहाटे , कविता खैरकर आदी महिलांनी सहकार्य केले.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या