मांग - गारोडी मित्र परिवार व्दारे श्रीसाई पालखी पदयात्रेचे भव्य स्वागत
कन्हान : - मांग - गारोडी मित्र परिवार व्दारे कन्हान ते शिर्डी श्रीसाई पालखी पदयात्रेचे फुलांचा वर्षावात विधीवत पुजा , अर्चना करुन पालखी पदयात्रेत सहभागी भाविकांचे स्वागत करण्यात आले .
श्रीराम नवमी उत्सवा निमित्त श्री साई राम पालखी सोहळा समिति कन्हान च्या वतीने साई पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते . गुरुवार (दि.५) मार्च रोजी इंदिरा नगर येथील साई मंदिरात विधिवत पूजा अर्चना करुन पदयात्रेचा भव्य शुभारंभ करण्यात आला . पालखी पदयात्रा विविध मार्गाने भ्रमण करुन कन्हान गांधी चौक येथे पोहचली असता मांग - गारोडी मित्र परिवार व्दारे कन्हान ते शिर्डी श्री साई पालखी पदयात्रेचे फुलांचा वर्षाने जल्लोषात स्वागत करण्यात आले .
पालखीची विधीवत पुजा , अर्चना करुन पालखी पदयात्रेत सहभागी भाविकांना पिण्याचे पाणी बॉटल , फराळी पॉकेट , फळ वितरण करून यात्रेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या . कार्यकमाच्या यशस्वितेकरिता नेवालाल पात्रे , सावन लोंढे , रामजी पात्रे , विकी खडसे , सुधाकर शेंडे , गुरुदेव काबले , अर्जुन पात्रे , सतिश नाडे , कपली लोंढे , आशिष इंचुलकर , विनोद पात्रे , आजु गायकवाड , चंदन पात्रे , वीर गायकवाड , बिजेश पात्रे , जुग्णु लोंढे , केसरबाई लोंढे , मीराबाई गायकवाड , सरिकाबाई पात्रे , ननु गायकवाड आदीनी परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या