Advertisement

शिवराय मनामनात , शिवराय जयंती घराघरात " या उपक्रमांतर्गत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा


शिवराय मनामनात , शिवराय जयंती घराघरात " या उपक्रमांतर्गत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा


राजे शिव छत्रपती  प्रतिष्ठान च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन 


कन्हान : - महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती (तिथीनुसार) टेकाडी गावात शिवप्रेमीच्या वतीने घरावरती भगवा झेंडे लावुन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार , पुष्प अर्पण करीत मानवंदना देऊन  थाटात साजरी करण्यात आली .


शुक्रवार (दि.६) मार्च रोजी टेकाडी येथे राजे शिव छत्रपती  प्रतिष्ठान च्या वतीने शिवराय मनामनात , शिवराय जयंती घराघरात " या उपक्रमांतर्गत गावात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शिवराय जयंती घरोघरी मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली . हनुमान मंदिर परिसर येथे संपूर्ण परिसर सजवून रंगरंगोटी करून राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान तर्फे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा हरिचंद्र ठाकरे , रविंद्र गणोरकर व गोविंद शेंदरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले .  

शिवजयंती साजरी करायची असेल तर ३६५दिवस साजरी करा ! शिवराय फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाही , तर ते डोक्यात भिनवून घेण्याची गोष्ट आहे . मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन ज्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर देवत्व गाठलं , ते एकमेव अद्युतीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे योग्य मार्गदर्शन गणेश मस्के यांनी केले . या प्रसंगी  गणेश मस्के , अनिल कांबळे , देवेंद्रसिंह सेंगर , श्रीरामजी डोकरीमारे , केशव निमकर , शिवशंकर आकोटकर , मनोहर संतापे , शिवनारायण आकोटकर , गोपीचंद गुरधे , अर्जुन बर्वे , अमित इंगळे , आनंद राऊत , प्रज्वल हूड , अमोल राऊत , रामकृष्ण पावडे , संजय वासाडे , प्रणय हूड सह आदि नागरिक उपस्थित होते .


परिसरातील शिवप्रेमींनी आपल्या घरावरती भगवा झेंडा लावुन स्वत:च्या घरी शिवरायांची मुर्ती व प्रतिमा सुंदर सजवुन पुष्पहार व पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदनेने महाराजांना मानवंदना देऊन शिवराय जयंती घरोघरी थाटात साजरी करण्यात आली . 


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या