कन्हान मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनसंपर्क कार्यालय चे उद्घाटन
कन्हान: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे रामटेक लोकसभा क्षेत्र जनसंपर्क कार्यालय नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम जी मस्के यांचे कार्यालय चे उद्घाटन दिनांक 9 मार्च 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना संपर्कप्रमुख रामटेक लोकसभा क्षेत्र माननीय सुधीर जी सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते कन्हान येथे तारसा रोड करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये उपस्थिती संपूर्ण जिल्ह्याचे आजी-माजी शिवसेना पदाधिकारी व वरिष्ठ शिवसैनिक आणि नवीन पिढीचे शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यालय सुरू करण्याचे कारण म्हणजे जनताचे तक्रार व निवारा करणे संपूर्ण जिल्ह्याचे एक एक व्यक्ती पर्यंत जनसंपर्क करणे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार उभे करून जास्तीत जास्त निवडणूक लढविणे व जिंकने.
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party public relations office inaugurated in Kanhan
या कार्यक्रमांमध्ये कोराडी विभाग प्रमुख रोहित वाघमारे व कामठी शहरप्रमुख मुकेश यादव, शिवसैनिक राजेश बावनकुळे उपाध्यक्ष स्वराज्य फाउंडेशन नागपूर उपस्थित होते.
kanhan news


0 टिप्पण्या