Advertisement

कन्हान मध्ये जागतिक महिला दिवस आणि ग्राहक दिवस उत्साहात साजरा


कन्हान मध्ये जागतिक महिला दिवस आणि ग्राहक दिवस उत्साहात साजरा 


बिंदुमाधव जोशी यांच्या अथक प्रयत्नांमुळे १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा समंत करण्यात आला - कांचनमाला माकडे


कन्हान , कांद्री शहर विकास मंच च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन 


कन्हान : - कन्हान , कांद्री शहर विकास मंच च्या वतीने जागतिक महिला दिवस आणि जागतिक ग्राहक दिवस यांच्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन शनिवार (दि.१४) मार्च रोजी समाज भवन पाटील नगर येथे करण्यात आले .

International Women's Day and Consumer Day Celebrated with Enthusiasm in Kanhan.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ.कांचनमाला माकडे , प्रमुख पाहुणे ग्राहक पंचायत महाराष्ट्र पारशिवनी तालुका अध्यक्ष सौ.सुनिता मानकर , कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.वैष्णवी जगताप , अॅड.अधिवक्ता हुमा याजदानी , पुजा आळे , रिना गणवीर , मिनाक्षी कांबळे , निशा माहतो , ईशीका नागदेवे सह आदि मान्यवरांचा हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब , बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी शहर विकास मंच च्या महिला सदस्यांनी मान्यवरांचा आणि ग्राम विकास वस्तीगृह अधिक्षक सौ.मीना अंबाते यांचा शाॅल , पेन आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . विद्यार्थीनींना पेन वितरित करण्यात आले .


कार्यक्रमात अधिवक्ता (वकील) अॅड हुमा याजदानी , पुजा आळे , रिना गणवीर यांनी घरगुती हिंसाचार , कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक , शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक हिंसेविरुद्ध संरक्षण , हुंडा प्रतिबंधक कायदा , पोस्को कायदा , आॅनलाईन छळ आणि सायबर कायद्यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर महिलांना व विद्यार्थींनींना मार्गदर्शन केले.


महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. जेव्हा महिला त्यांचे हक्क ओळखतात तेव्हा खरा न्याय आणि समानता स्थापित होते. महिला या समाजाची शक्ती आहेत; मुली, माता, बहिणी आणि पत्नी म्हणून त्या कुटुंब आणि समाज वाढवतात. महिला प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा उंचावत आहेत , असे मोलाचे मार्गदर्शन सुनीता मानकर यांनी केले .


देशभरातील ग्राहकांना संघटित करण्याच्या उद्देशाने १९७४ मध्ये पाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ग्राहक पंचायतीची मुहूर्तमेढ बिंदुमाधव जोशी यांनी रोवली. सर्वसामान्य ग्राहकाला त्याचे हक्क मिळवून देणारी ही चळवळ देशभर फोफावली. जोशी यांच्या अथक प्रयत्‍नांमुळे १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवर असतांना १९९५ मध्ये ग्राहक कल्याण उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली होती. कॅबिनेट दर्जा असलेल्या या समितीचे अध्यक्षपद बिंदुमाधव जोशी यांनी भूषविले होते , असे सौ.कांचनमाला माकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन उपस्थितांना मार्गदर्शन केले .


कार्यक्रमाचे सुत्र संचालन महिला सदस्य अर्चना तांडेकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन जयश्री गडपाडे यांनी केले .


या प्रसंगी वैशाली खोब्रागडे , मेघा कोल्हे , ललीता ठाकरे , माया तायवाडे , प्रतिक्षा अंबादे , श्रुती कुळमिथे , शारदा सोयाय , सुभद्रा रोकड , कुसुम बर्वे , दिव्या ब्राम्हणकर , कविता चलपे , प्रिति मस्के , जोशीला मेश्राम सह आदि शालेय विद्यार्थींनी मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कन्हान , कांद्री शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , यश शेंडे , शुभम बावनकर , प्रमोद गिर्हे , अर्जुन पात्रे  , सुर्यभान चकोले , अविनाश कांबळे , मृणाल सरोजकर , अर्चना तांडेकर , मीना गिऱ्हे , जयश्री गडपाडे , सुषमा मस्के , रंजना किरपाने , मीना कळंबे , निखिल मेश्राम , निखिल तांडेकर , नाना ऊकेकर सह आदि सदस्यांनी परिश्रम घेतले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या