Advertisement

केडीके कॉन्व्हेंटमध्ये रंगोत्सव , होळीमिलन


केडीके कॉन्व्हेंटमध्ये रंगोत्सव , होळीमिलन


कन्हान : - टेकाडी परिसरातील केडीके कॉन्व्हेंट मध्ये शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांच्या सहभागात होळी मिलन व रंगोत्सव कार्यक्रम आयोजित केला गेला . संचालक अविनाश कांबळे यांनी होळी दहनाची माहिती दिली . यावेळी विद्यार्थ्यांनी सोबत आणलेला गुलाल व रंग एकमेकांना लावून रंगोत्सव साजरा केला . शेवटी विद्यार्थ्यांना मिठाई वितरित करुन होळी मिलनाचा समारोप करण्यात आला . या प्रसंगी शिक्षिका मनिषा कांबळे , अर्चना कारेमोरे , अपर्णा गजभिये , सुरेखा हिंगे यांच्या सह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Colour Festival, Holi Celebration at KDK Convent

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या