Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आमडी येथे संपन्न


छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आमडी येथे संपन्न


आमडी शिबीरात परिसरातील १२६३ नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग , १२४८ नागरिकांना योजनेचा लाभ


कन्हान : - पारशिवनी तहसील अंतर्गत आमड़ी येथे दूसऱ्या टप्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीरात विविध शासकिय येजनेचा लाभ नागरिकांना देऊन शिबीर शांततेत संपन्न झाले .


शनिवार (दि.१४) मार्च ला आमडी येथे मा.सुरेश वाघचौर तहसीलदार पारशिवनी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेश गोमकाले तालुकाध्यक्ष समन्वय समिती तालुका , राजु भोस्कर अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना , सुभाष तड़स उपसभापती कृषी उत्पन्न बजार समिती , सुभाष जाधव गटविकास अधिकारी , डॉ. वैशाली हिंगे प्राथमिक आरोग्य केंद्र साटक , राकेश वशु तालुका कृषी अधिकारी , साटक पशुवैद्यकिय अधिकारी आमड़ी व साटक तसेच संबंधित गावांचे सरपंच ,उपसरपंच , ग्राम पंचायत सदस्य , मिश्रा , कुंभरे , सोनाली टेगुरे , नायब तहसिलदार , जि.प शाळेचे शिक्षक , शिक्षिका सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते . या शिबीरात १२४८ नागरिकांनी विविध शासकीय योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला . नागरिकांना सातबारा , फॉर्म ४-ए , फेरफार संशोधन , जात प्रमाणपत्र , उत्पन्न दाखला , रहिवाशी प्रमाणपत्र , संजय गांधी योजना , राशन कार्ड , सनद वितरण , आरोग्य तपासणी , आधार कार्ड , प्रधानमंत्री किसान सम्मान निधि स्वीकृति तथा लक्ष्मी मुक्ति अश्या विविध योजना संबंधित सेवा प्रदान करण्यात आल्या .

Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan Camp Concluded at Amdi.

शिबीरात तहसील कार्यालय अंतर्गत विभागाचे स्टाल लावण्यात आले होते . नायब तहसीलदार सहित मंडल अधिकारी , महसुल विभागाचे पटवारी , कर्मचारी , आमडी ग्रामपंचायत अधिकारी , कर्मचारी , आंगनवाड़ी सेविका , आशावर्कर आदी उपस्थित होते . शिबीरात १२६३ नागरिकांनी प्रत्यक्ष भाग घेतला . यात १५ शेतकऱ्यांचे तुकडेबंदी प्रस्ताव नोंद करून अधिकाऱ्यांनी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या