छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरचा पारशिवनीत जागर ; दोन टप्प्यांत आयोजन
करंभाड मंडळात उद्या ७ मार्च आणि आमडी मंडळात १४ मार्च रोजी शिबीराचे आयोजन
पारशिवनी : - शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी पारशिवनी तहसील कार्यालयाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात करंभाड मंडळात उद्या ७ मार्च रोजी आणि आमडी मंडळात १४ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
शिबिराच्या पूर्व तयारीसाठी महसूल पथकाने करंभाड , भागीमहारी , खंडाळा पारडी , निंबा , सकरला , दहेगाव जोशी , पेंढरी , ईटगाव , दिगलवाडी , सालई मोकासा व सावळी या गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला असून नायब तहसीलदार अनिकेत कांबळे , मुकेश मिश्रा , दयाराम कुंभरे , मंडळाधिकारी व तलाठी यांनी शिबिरात मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली .
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajsw Samadhan Camp's Parshivni Jagar; Organized in two phases
या शिबिरात महसूल व भूमी अभिलेख विभागा मार्फत प्रलंबित फेरफार निकाली काढणे , अभिलेख दुरुस्ती व डिजिटल ७/१२ उतारे , तसेच संजय गांधी निराधार , श्रावण बाळ व पीएम किसान यांसारख्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे . आरोग्य तपासणी , आभा कार्ड नोंदणी , शालेय दाखले , वीज वितरण , बँक सुविधा , कृषी व वनविभाग मार्गदर्शन , महिला व बालविकास , पुरवठा विभाग आणि सेतू केंद्राद्वारे आधार सेवा एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहेत . प्रलंबित दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप , अकृषक तरतुदींबाबत मार्गदर्शन , अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करणे , जॉब कार्ड व रेशन कार्ड दुरुस्ती आदी कामे तात्काळ मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरास उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सुभाष वाघचौरे आणि तहसील प्रशासनाने केले आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या