Advertisement

अवैध देशी दारुच्या वाहतुकीवर कारवाई ; आरोपी पोलीसांच्या ताब्यात


अवैध देशी दारुच्या वाहतुकीवर कारवाई ; आरोपी पोलीसांच्या ताब्यात


दुचाकी वाहन व दारुच्या निपा सह ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 


कन्हान : - कन्हान शहरातील आंबेडकर चौक येथे कन्हान पोलीसांनी नाकाबंदी करुन अवैध देशी दारुच्या वाहतुकीवर कारवाई केली . कारवाईत आरोपीला ताब्यात घेऊन दुचाकी वाहन आणि दारुच्या निपासह एकुण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

Action taken against illegal transportation of country liquor; Accused in police custody

रविवार (दि.१) मार्च रोजी कन्हान पोलीस होळीच्या पार्श्वभुमीवर शांतता राखण्याचा उद्देशाने व अवैध दारु विक्री आणि वाहतुकीवर कारवाई  करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना अवैधरित्या देशी दारुची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली . 

पोलीसांनी आंबेडकर चौक येथे नाकाबंदी केली असता एक संशयित हिरो हंडा एच एफ डिलक्स दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० आर ४४९६ ही मिळुन आली . वाहनास थांबवुन पोलीसांनी पाहणी केली असता खोक्यात देशी दारुच्या निपा मोठ्या प्रमाणात दिसुन आल्या . 

आरोपी नामे १) विशोद विश्वेश्वर पात्रे (वय २५) रा.वाघधरे वाडी , कन्हान यास परवाना बाबत विचारफुस केली असता त्यांनी परवाना नसल्याने सांगितले . पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन देशी दारुच्या १०० निपा किंमत ४,००० रूपये , हिरो हंडा एच एफ डिलक्स दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० आर ४४९६ किंमत ५०,००० रुपए असा एकुण ५४,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . 

या प्रकरणी कन्हान पोलीसांनी आरोपी विशोद पात्रे विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .


सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात करण्यात आली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या