Advertisement

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद सीआरपीएफ जवानांना वाहिली श्रद्धांजली


पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद सीआरपीएफ जवानांना वाहिली श्रद्धांजली

कन्हान : - जम्मू - काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ जवानांना कन्हान शहर विकास मंच च्या वतीने तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली .

जम्मू - श्रीनगर राष्ट्रीय महामार्गा वर १४ फेब्रुवारी २०१९ रोजी, सीआरपीएफ वाहनांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता , ज्यात ४० भारतीय सुरक्षा कर्मचारी शहिद झाले होते . जम्मू आणि काश्मीर च्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा जवळील लेथपोरा भागात हा हल्ला झाला होता.

 दहशतवादी हल्ल्याला शनिवार दि.(१४) फेब्रुवारी २०२६ रोजी सात वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या वतीने तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नवनिर्वाचित जेष्ठ सदस्य सुर्यभान चकोले , निखिल तांडेकर यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला आणि स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन शहिद जवान अमर रहे.... अमर रहे.... अमर रहे असा जयघोष केला . मंच सदस्यांनी स्मारकावर पुष्प अर्पित करुन औआणि दोन मिनटाचा मौन पाळुन दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली अर्पित केली . 

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , रामभाऊ ठवकर , नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , सुर्यभान चकोले , निखिल तांडेकर महिला सदस्य अर्चना तांडेकर , मीना गिऱ्हे , सुषमा मस्के , रंजना किरपाने , शुभम बावनकर , निखिल मेश्राम , अभिषेक साखरे , यश शेंडे , मृणाल सरोजकर , रुंजल मेश्राम , आयुष संतापे , प्रथमेश कोल्हे , आयुष काकडे सह आदि सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते .

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या