Advertisement

पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकी वाहन चालक जख्मी


पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकी वाहन चालक जख्मी


कोळसा खदान नं.६ मार्गावर अपघात , कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल


कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खदान नंबर सहा  मार्गावर पिकअप वाहन चालकाने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली . धडकेत दुचाकी वाहन चालक गंभीर जख्मी झाल्याने त्याला कामठी येथे चौधरी हाॅस्पीटल मध्ये उपचाराकरिता भर्ती करण्यात आले आहे .


शुक्रवार (दि.२७) फेब्रुवारी ला सकाळी ९:३० वाजता दरम्यान विरेंद्र कल्लु नायक वय ४० वर्ष रा. कोळसा खदान याचा लहान भाऊ कुलदीप कल्लु नायक हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० सी एन ९९३८ ने गोंडेगाव कोल माईंस येथे ट्रक चालविण्याचा कामावर जात होता . मस्जिद समोरील मार्गावर खदान नंबर सहा कडुन येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक सीजी १० बीवी ५७३६ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली . धडकेत कुलदीप नायक वाहना सोबत खाली रस्त्यावर पडल्याने त्याचा उजव्या हाताची आणि पाया ची हड्डी तुटली .

Two-wheeler driver injured in collision with pickup vehicle

घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, सचिन वेळेकर, नवीन पाटील घटनास्थळी दाखल झाले . स्थानिक नागरिकांच्या मदतीने जख्मी कुलदीप नायक ला जे.एन.हाॅस्पीटल कांद्री येथे नेले असता तेथील डाॅक्टरांनी प्राथमिक उपचार करुन चौधरी हाॅस्पीटल कामठी येथे रेफर केल्याने कुलदीप नायक ला उपचारार्थ भर्ती केले आहे .


या प्रकरणी कन्हान पोलीसांनी विरेंद्र नायक यांचे तक्रारीवरून पिकअप वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या