कन्हान परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना
विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : - अखंड हिदुस्थानाचे आराध्य दैवत , हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव कन्हान परिसरात विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करुन मानवंदना देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
ढिवरपुरा आंगनवाडी पिपरी - कन्हान
Tributes paid to Chhatrapati Shivaji Maharaj in Kanhan areaरी - कन्हान परिसरातील ढिवरपुरा आंगनवाडी क्रमांक १२६ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सुनिता मानकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आले . शिवाजी महाराजांच्या घोषणा देत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी पालकांना आणि विद्यार्थांना बुंदीचे वाटप करण्यात आले .
राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान , टेकाडी
राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान , टेकाडी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्त हनुमान मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली . यावेळी गणेश मस्के यांनी शिवाजी महाराज यांचा जीवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी सुरेश मोहाडे , गणेश मस्के , गोविंद शेंद्रे , शिवशंकर आकोटकर , मनोहर संतापे , अनिल कडू सह आदि नागरिक उपस्थित होते .
शिवशाही ग्रुप , वराडा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती निमित्त शिवशाही ग्रुप , वराडा च्या वतीने गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित इंदिरा नागमोते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी शुभम नागमोते , स्वप्निल वरखडे , कल्पना ठाकरे , सुर्वणा टाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . "छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो , जय भवानी , जय शिवाजी" चा जयघोष करण्यात आला . उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन केले . या प्रसंगी मारोतीराव नागगमोते , मेघा टाले , सपना कंरटेववार , सुनीता घोडमारे , साधना चिखले , चंद्रकला पुसतकर , अमोल पुस्तकार , हर्षल टाकरे , धोंबाजी चारडे , किशोर टाले , दिवाकर जामकर , रवी टाले , सुरेंद्र गिऱ्हे , नितीन हेटे , दिलीप टाकरे , धनराज घोडमारे , अभय हेटे , उमेश चिखले , पंकज हेटे , हेमंत गिऱ्हे , शिशुपाल घोडमारे , कवडू पुस्तकार , नाना पुस्तकार , ईश्वर घोडमारे , बाळकूश्रण घोडमारे , शुभम पुंड प्रनाय गुरंदे , कैलास पुंड , बाळकुशन पारधी , अक्षय विरुरकार , बाल्या ब्रामकर , रमेश बगैतकर , उद्देश पारधी सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या