पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांना अभिवादन , बलिदान व्यर्थ जाणार नाही
कन्हान : - भारतीय जनता पार्टी कन्हान मंडळ व कांद्री येथील कार्यकर्त्यांच्या वतीने कांद्री येथील भारत माता चौकात पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमा दरम्यान “ज्यांनी देशासाठी सांडले रक्त, त्यांच्या बलिदानाचा हा देश कायम ऋणी राहील ,” अशा शब्दांत शहीदांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . राष्ट्रप्रेमी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला . उपस्थितांनी शौर्य , त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा संकल्प पुन्हा दृढ केला .
या प्रसंगी योगेश वाडीभस्मे (माजी जिल्हा परिषद सदस्य) , वीरेंद्र सिंग (अध्यक्ष,भाजपा कन्हान मंडळ) , जितेंद्र बावनकुळे (महामंत्री) , सचिन वासनिक (महामंत्री) , राहुल वंजारी (उपाध्यक्ष , नागपूर जिल्हा कामगार आघाडी) , दिनेशभाऊ राऊत (महामंत्री, कामगार आघाडी) व राजेश पोटभरे (कार्यालय मंत्री) , रोशन किरपान , गुरुदेव चकोले , नितेश कांबळे , पवन यादव , मुकेश यादव , मयूर पोटभरे , नरेश शेंद्रे , बाबा बावणे , विकी जिभकाटे , दीपक राठोड , अमोल वानखेडे , जितेंद्र पांडे आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अमर शहीदांना यावेळी कोटी-कोटी प्रणाम करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या