शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली
शहिद प्रकाश देशमुख अमर रहे ....अमर रहे ....अमर रहे
कन्हान : - कन्हान शहरातील वीर सुपुत्र शहिद प्रकाश देशमुख यांचा स्मृति प्रित्यर्थ माजी सैनिक आणि शैकडो नागरिकांनी तारसा रोड शहिद चौक येथे शहिद स्मारकावर पुष्पचक्र अर्पित श्रद्धांजली अर्पित केली .
शहिद प्रकाश देशमुख यांचा जन्म २४ मार्च १९७८ मध्ये झाला असून त्यांनी आपल्या कर्तव्यातुन १९९६ मध्ये भारतीय सेनेत शिपाई पदावर भर्ती झाले होते . ११ फेब्रुवारी १९९९ रोजी देशाचे रक्षण करतांना दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जम्मू यध्ये शहीद झाले , लहान वयातच सैन्यात सेवा केली. या घटनेला २७ वर्ष पूर्ण झाल्याने तारसा रोड शहिद चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात शहिद प्रकाश देशमुख यांचे भाऊ प्रदीप देशमुख , आई लीलाबाई देशमुख , कामठी एनसीसी ओटीए सुभेदार नितीन वाघ , राहुल खैरनार , पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , माजी नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर सह आदि मान्यवरांचा हस्ते देशमुख यांचा निवासस्थानी प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करून अभिवादन करण्यात आले . त्यानंतर शहिद प्रकाश देशमुख यांचा स्मारकावर सैनिकांचा हस्ते पुष्पचक्र अर्पित करून सलामी दिली आणि राष्ट्रगीत गायन करून दोन मिनटाचा मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली .
या प्रसंगी कन्हान - पिपरी नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक घोडके , सुनीता मानकर , माजी सैनिक गौतम इवनाते , विशाल देऊळकर , मधुकर बोरकर , आशिष सोनी , जयचंद विश्वकर्मा , लाला चव्हान , नौशाद सिद्धिकी , नितीन महाजन , महेंद्र भगवे , शरद डोणेकर , ऋषभ बावनकर , प्रशांत मसार , वैष्णव डोणेकर , किशोर वासाडे , सुर्यभान चकोले , अविनाश कांबळे , अमोल देऊळकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या