Advertisement

नाली आणि फुटपाथवर टाकलेली गिट्टी , दगड , बोल्डर , मलबा हटवुन नालीची दुरूस्ती करण्याची मागणी


नाली आणि फुटपाथवर टाकलेली गिट्टी , दगड , बोल्डर , मलबा हटवुन नालीची दुरूस्ती करण्याची मागणी


कन्हान हाकर्स युनियन , कन्हान कृति समितीचे नगराध्यक्षांना निवेदन. 


कन्हान  : - कन्हान शहरातील आनंद रेस्टॉरंट ते इंडियन नॅशनल होम पाइप कंपनी गेट दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक .४४ लगत नाली (ड्रेनेज) व फूटपाथवर ले - आउट धारकाने गिट्टी , माती , बोल्डर व मलबा टाकल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे . ले-आऊट धारकावर दंडत्माक कार्यवाही करून ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी कन्हान हॉकर्स युनियन , कन्हान कृती समिती च्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांना निवेदन देऊन केली आहे .



नगर परिषद प्रशासनाने दि.४ जानेवारी २०२५ रोजी आंनद रेस्टाॅरेंट ते होम पाईप कंपनी गेट पर्यंतचे ८० दुकाने तोडुन दुकानदारांना बेरोजगार केले . ग्रोमोर वेंचर्स ले - आउट धारकाने हिंन्दुस्तान लीवर लिमिटेड कंपनीची संरक्षण भिंत मध्यरात्री तोडली आणि फूटपाथ पर मलबा , गिट्टी , बोल्डर , माती टाकुन समस्या निर्माण केली . तसेच (दि.२) ऑगस्ट २०२५ रोजी ले-आउट धारकाने गिट्टी चा ट्रक ले - आउट मध्ये नेतांना होम पाईप कंपनी गेटच्या जवळची एनएचएआयची नवीन नाली (ड्रेनेज) तोडली .  


नगर परिषद प्रशासनाला दि. ८ जानेवारी २०२५ , १६ जानेवारी २०२५ , १० मार्च २०२५ , ०५ जुन २०२५ रोजी निवेदन पत्र देऊन नाली दुरुस्ती आणि गिट्टी , मलबा हटविण्याची मागणी केली . परंतु प्रशानाने नाली वरील मलबा हटविलेला नसुन संबधित ले-ऑऊट धारकावर दंडात्मक कारवाई केली नाही . तोडलेली नाली जशीची तशीच असल्याने आरोग्याचा आणि अपघातामुळे जीवहानीची शक्यता निर्माण झाली आहे . या गंभीर समस्या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधन्याकरिता कन्हान हाकर्स युनीयन , कन्हान कृति समिती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवार (दि.२) फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांची भेट घेतली . ले - आऊट धारका कडुन करण्यात आलेल्या बेकायदेशीर अडथळ्यामुळे सार्वजनिक आरोग्य , वाहतुक व नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्याची माहिती दिली . 


तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांनी बांधलेल्या नविन ड्रेनेज नालीचे नुकसान व अद्यापन झालेली दुरुस्ती कडे  लक्ष वेधले . नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी सकारात्मक चर्चा करुन प्रकरणाची गंभीर दखल घेत १५ दिवसांच्या आत संबंधित विभागांना निर्देश देऊन योग्य व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल , असे आश्वसित केले . तसेच बेकायदेशीरपणे टाकलेला मलबा तात्काळ हटविणे व नुकसानग्रस्त ड्रेनेज नालीच्या दुरुस्तीची आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येईल , असे ही त्यांनी स्पष्ट केले . कन्हान हॉकर्स युनियन, कन्हान कृती समिती व्दारे नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासनाने दिलेल्या काॅल मर्यादेत ठोस व प्रत्यक्ष कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे .


या प्रसंगी निवेदन देतांना कन्हान हाकर्स युनियन, कन्हान कृति समिति सदस्य चिराल वैध , सचिन चकोले , किष्णा मोहबे , नुसरत परवेज , प्रकाश सिंग , प्रदीप गायकवाड़ , अजय चव्हाण , गजानन कपाटे , रॉबिन निकोसे , सुभाष चंद्र अहिरवार , रामाधार बुंदेलिया , प्रतिभा हारगुडे , इंदीरा वाल्दे , सरोज बुंदेलिया , वनिता बूंदेलिया , सुनिल बुंदेलिया सह आदि दुकानदार उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या