प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सिकलसेल तपासणी मोहीम
कन्हान : - सिकलसेल आजाराचा प्रसार रोखण्यासाठी आणि या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या दृष्टीने कन्हान - पिपरी शहरात व ग्रामिण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान राबविले जात आहे . मोहिमे दरम्यान प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन ० ते ४० वर्ष वयोगटाचे लाभार्थीची सिकलसेल तपासणी युद्ध स्तरावर सुरु आहे .
शासनाची मोहिम ही (दि.१५) जानेवारी ते (दि.७) फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविण्यात येत आहे . यामध्ये तपासणी नंतर बाधित आढळल्यावर रूग्णाची एचपीएलसी नावाची दुसरी तपासणी प्रकार निश्चित करण्यासाठी करण्यात येते . त्यानंतर निश्चित प्रकारावर औषधोपचार सुध्दा करण्यात येणार आहे आणि त्या नुसार औषधोपचार करण्यात येईल . सिकलसेल हा अनुवंशिक व गंभीर रक्ताचा आजार असुन रुग्णांनी आयुष्यभर काळजी आणि उपचार घेणे आवश्यक आहे . आजाराचे दोन प्रकार आहे , एक म्हणजे निरोगी रक्तपेशी आणि दुसरी म्हणजे सिकलसेल बाधित रक्तपेशी असे दोन प्रकार आहे .
सिकलसेल आजाराची लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असुन या आजारामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे , भूक न लागणे , हात व पायांवर सूज येणे , सांधेदुखी , तीव्र वेदना , लवकर थकवा येणे तसेच चेहरा निस्तेज दिसणे अशी लक्षणे आढळुन येतात . सिकलसेल आजाराची वेळीच तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास रुग्ण निरोगी व सुरक्षित आयुष्य जगु शकतो . त्यामुळे या विशेष अभियानात आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे करण्यात येणाऱ्या तपासणीस नागरिकांनी सहकार्य करावे आणि मोहिमेत सहभागी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन तपासणीस मदत करावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. एकांक्षा कानफाडे , प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.आयुषी डंभारे , डॉ. वैष्णवी जगताप यांनी केले आहे .
मोहिम यशस्वितेकरिता आरोग्य सहायक हंसराज ढोके , सुनिल गायकवाड , अतुल देशभ्रतार , प्रणिल सोनोने , अखिलेश चौधरी , तुषार लांजेवार , विलास सहारे , हरिदास पराते , राजेश गाजवे , श्रावण इंगळे , तिरुपती येतम , गौतम झोडापे , आरोग्य सेवक धनश्री खेडेकर , शारदा जोगडेकर , वंदना भोस्कर , प्रेमलता कोल्हे , मंजुषा पडवेकर , आशा डोंगरे आदि सह आशा वर्कर विशेष योगदान देत आहे .
Sickle cell screening campaign by Primary Health Center Kanhan
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या