Advertisement

शिवराय मनामनात, शिवराय जयंती घराघरात


शिवराय मनामनात, शिवराय जयंती घराघरात


कन्हान : - महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती  कन्हान शहरात शिवप्रेमींनी घरावरती भगवा झेंडा लावुन महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार , पुष्प अर्पण करून मानवंदना देऊन 'शिवराय मनामनात, शिवराय जयंती घराघरात" थाटात साजरी करण्यात आली .

 Shivaji in the heart, Shivaji Jayanti in every household


गुरूवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी मराठा सेवा संघा व्दारे " शिवराय मनामनात , शिवराय जयंती घराघरात " या उपक्रमांतर्गत कन्हान शहरात दरवर्षी शिवराय जयंती घरोघरी मोठया उत्साहाने साजरी करण्यात येत आहे . सुपर टॉऊन कन्हान येथे योगराज अवसरे , दिपक उघडे , भगवान कडु , तुकाराम नगर कन्हान येथे ताराचंद निंबाळकर , विठ्ठल मानकर , नामदेव नवघरे , शिवनगर कन्हान येथे राकेश घोडमारे , रामनगर येथे शांताराम जळते , गणेश नगर येथे मोतीराम रहाटे , वसंतराव इंगोले , प्रमोद खैरकर , कृष्णराव इंगोले , पिपरी येथे देवा चतुर , प्रशांत मसार , पाटील नगर गहुहिवरा रोड कांद्री येथे दिंगाबर हारगुडे सह परिसरात शिवप्रेमींनी आपल्या घरावरती भगवा झेंडा लावुन स्वत:च्या घरी शिवरायांची मुर्ती किवा प्रतिमा सुंदर सजवुन पुष्पहार व पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदनेने महाराजांना मानवंदना देऊन शिवराय जयंती घरोघरी थाटात साजरी करण्यात आली . 

सुपर टॉऊन कन्हान येथे सायंकाळी ६ वाजता शांताराम जळते , ताराचंद निंबाळकर , मोतीराम रहाटे , विठ्ठल मानकर , दिंगाबर हारगुडे , राकेश घोडमारे ,  योगराज अवसरे , भगवान कडु , दिपक उघडे , दुर्गेश कडु , स्वप्निल अवसरे , लताताई जळते , मनिषा कडु , भारती अवसरे , इंदिराबाई मदन आदींच्या उपस्थित "शिवराय मनामनात, शिवराय जयंती घराघरात" मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या