वराडा गावात तीन दिवसीय कार्यक्रमाने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा
कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील वराडा गावात शिवगर्जना फाउंडेशन ग्रुप , वराडा च्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
Shiva Janmotsav celebrated with enthusiasm in Varada village with a three-day program
बुधवार (दि.१८)फेब्रुवारी रोजी गावातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता , राष्ट्रमाता जिजाऊ मां साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन मानवंदना देण्यात आली . आरोग्य रोगनिदान शिबीर आणि रक्तदान शिबीर कार्यक्रमाने महोत्सवाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला . सिटी हाॅस्पीटल , कामठी येथील डॉक्टर आणि चंमुच्या सहकार्याने आरोग्य रोगनिदान शिबीरात ७० नागरिकांच्या विविध आरोग्यांची तपासणी करण्यात आली .अमन ब्लड सेंटर अँड हॉस्पिटल गांधीबाग, नागपूर येथील चमुंच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले .
Shiva-Janmotsav-celebrated-with-enthusiasm-in-Varada-village-with-a-three-day-program
गुरुवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे पुजन करुन मानवंदना देऊन भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक विविध मार्गाने भ्रमण करुन हनुमान मंदिर परिसरात मिरवणुकीचे समापन करुन महाप्रसाद वितरण करण्यात आले . शनिवार (दि.२०) फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिवचरित्रकार ह.भ.प. किशोर महाराज ठाकरे यांचे शिवकिर्तन कार्यक्रम पार पडले . किर्तनात गायनाचार्य सुभाष महाराज चंदन बावने , शंकर महाराज शेंडे , कमलेश महाराज गुर्वे , म्रृंदगाचार्य मुकेश महाराज रुंघे प्रामुख्याने उपस्थित होते . या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिवगर्जना फाउंडेशन ग्रुप , वराडा च्या तरुणांनी परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या