Advertisement

कन्हान मध्ये रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


कन्हान मध्ये रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन 


कन्हान : - कन्हान , कांद्री परिसरात ठिकठिकाणी रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .


संघमित्रा वंदना बहुउद्देशीय संस्था कांद्री


संघमित्रा वंदना बहुउद्देशीय संस्था कांद्री , कन्हान च्या वतीने रमाबाई आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन समाज भवन पाटील नगर कांद्री येथे करण्यात आले . संस्थेच्या अध्यक्षा सारिका धारगावे , प्रमुख अतिथी माजी नगरसेविका अनिता पाटील , संगीता खोब्रागडे , कल्पना पाटील , मालती कोल्हटकर यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , रमाबाई आंबेडकर , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमात "मी रमाई "हे नऊ पात्राचे नाट्यवाचन च्या माध्यमातून रमाई चा संपूर्ण जीवनपट सादर करण्यात आला . नाट्यवाचन करणाऱ्या महिलांना माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांच्याकडून पुस्तकांचे वाटप करुन सम्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन गौतमी गजभिये व आभार प्रदर्शन गुड्डी सांगोळे यांनी केले . या प्रसंगी अशोक पाटील , नगर सेवक प्रशांत पाटील , जनबंधु ठमके , ऋषभ बावनकर , रवींद्र दुपारे , रुद्र मेश्राम , वंदना शेंडे ,

गौतमा राऊत , नीता मेश्राम , 

सोनु गणविर , रमा भेलावे , जोसना ठवरे , माधुरी देशपांडे , जयश्री मेश्राम ,  विविधा चव्हाण , रेखा डहाड , सुजाता भेलावे , दिपा सोमकुवर , वैशाली मेश्राम सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता हरिदास धारगावे , रमा मेश्राम , मंदा बागडे , रेखा रामटेके , प्रतिमा मेश्राम सह आदिंनी परिश्रम घेतले .


बहुजन समाज पार्टी कन्हान


बहुजन समाज पार्टी कन्हान च्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती कन्हान येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साजरी करण्यात आली . यावेळी भन्ते के.सी यस लामा यांच्या उपस्थितीत रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व धम्मवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी बीएसपी रामटेक विधानसभा अध्यक्ष राजेश फुलझेले यांनी रमाई आंबेडकर यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . या प्रसंगी कुसुम पाटील , दहीवलकर ताई , वाघधरे मॅडम , रोशन मेश्राम , रूपेश मेश्राम , नरेश चिमणकर , संघपल शेंडे , रविन्द्र दुपारे , दिवाळू मेश्राम , रमेश गजभिये , दिनेश रंगारी , जितू टेंभुर्णे इतर कार्यकर्ते उपस्थित होते .


भाजपा कांद्री शहर


भाजपा कांद्री शहर च्या वतीने रमाबाई आंबेडकर जयंती अभिवादन करुन साजरी करण्यात आली . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी मान्यवरांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . भाजप पदाधिकार्यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन केले . या प्रसंगी गुरुदेव चकोले , सचिन वासनिक , विनोद कोहळे , नितेश कांबड़े , भगवान सावरकर , शिवगोपाल यादव , दिनेश राउत ,रोशन किरपान , आकाश कपासे आदि प्रामुख्याने उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या