ग्रामीण विकास विद्यालयाचा मोहित राज्यात प्रथम
कन्हान : - राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी २०२५ - २६ मध्ये प्राथमिक विद्यार्थी (इयत्ता ६ ते ८) गटात ग्रामीण विकास विद्यालयाच्या मोहित महेश राऊत याने प्रथम पारितोषिक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला .
मोहितने सादर केलेले “स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट फॉर पब्लिक प्लेसेस” हे अभिनव व समाजोपयोगी मॉडेल सार्वजनिक ठिकाणी होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपयुक्त ठरत आहे . रेल्वे स्थानके , बस स्थानके , शाळा , रुग्णालये , बाजारपेठा आदी ठिकाणी पाण्याचा योग्य वापर व्हावा , या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या मॉडेलमध्ये सेन्सर - आधारित नियंत्रण प्रणाली , पाण्याचा वापर मोजणारे यंत्र , स्वयंचलित बंद - चालु यंत्रणा , पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर तसेच गळती ओळखणारी व्यवस्था यांचा समावेश आहे . कमी खर्चात अधिक परिणामकारक ठरणारे हे मॉडेल असल्याचे परिक्षकांनी नमुद केले . या उल्लेखनीय यशामागे लक्ष्मीकांत बांते , मयुर भोंबे आणि प्रदीप घोरमाडे यांचे शास्त्रीय मार्गदर्शन लाभले .
Mohit from the Rural Development School secured first place in the state.
मॉडेल डिझा इन , सादरीकरण आणि संकल्पना स्पष्टतेसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केल्याने मोहितच्या कल्पनेला व्याव हारिक व शाश्वत स्वरूप प्राप्त झाले . या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमोल गारुडी आणि सचिव विजय कठाळकर यांनी मोहित व त्याच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले . विद्यार्थ्यां मध्ये संशोधनवृत्ती , पर्यावरण - जाणीव आणि सामाजिक जबाबदारी निर्माण करणारी ही कामगिरी अभिमाना स्पद असल्याचे त्यांनी सांगितले . मोहितच्या यशामुळे ग्रामीण विकास विद्यालयाचे नाव राज्यभर उज्ज्वल झाले असुन भविष्यात विद्यार्थी अशाच नवोन्मेषी उपक्रमांतुन राष्ट्रीय पातळी वर ही चमकतील असा विश्वास शाळा परिवाराने व्यक्त केला आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या