Advertisement

शैक्षणिक प्रश्न व पत्रकारितेतील बदलांवर सखोल संवाद


शैक्षणिक प्रश्न व पत्रकारितेतील बदलांवर सखोल संवाद


आदर्श शिक्षण संस्थे व्दारे पत्रकारांचा सत्कार


कन्हान : - आइडियल एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित आदर्श हायस्कूल कन्हान व आइडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळा कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा सन्मान व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले .



कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव भरत साळवे , प्रमुख अतिथी एन एस मालविये , शाळेचे मुख्याध्यापक जी.डी यादव आदि मान्यवरांचा हस्ते पूजनिय सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी ज्येष्ठ पत्रकार एन.एस मालविय सर , अजय त्रिवेदी , मोतीराम रहाटे , कमल यादव , सुनील सरोदे , मोहन रंगारी , ऋषभ बावनकर व विवेक पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . पत्रकारांनी आपल्या मनोगतातुन शाळांसमोरील सध्याच्या समस्या , मराठी व हिंदी माध्यमांच्या शाळा ओस पडण्याची कारणे , शिक्षक व विद्यार्थ्यांसमोरील अडचणी यावर प्रकाश टाकला . तसेच पत्रकाराची भूमिका काय असावी , लेखणीची जबाबदारी , आधीची व आजची पत्रकारिता यातील फरक , प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी या बाबत आपले अनुभव प्रांजळपणे मांडले . यावेळी पत्रकारांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सकारात्मक , प्रामाणिक व समाजाभिमुख पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले . शिक्षकवृंदांनीही पत्रकारांशी संवाद साधत शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव व समस्या मांडल्या .पत्रकारांच्या सामाजिक योगदानाचा गौरव म्हणुन आदर्श शिक्षण संस्थेच्या वतीने हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले . 



कार्यक्रमात आदर्श हायस्कूल कन्हान व आइडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळेचे शिक्षक मनोज डोंगरे , अलंकार राखडे , शैलेश सोलंकी , प्रशांत वैद्य , विजया मुंडले , प्रीती बोपचे , प्रतिभा तिघरे , पुजा तिवारी , रक्षा शुक्ला , सुरेश वंजारी , जगदीश दुबे , अरविंद नेवारे आदीसह शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या