Advertisement

कन्हान-पिपरीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर


कन्हान-पिपरीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर


नगरसेवक हरिष तिडके यांचे वेकोलि प्रशासनाला निवेदन


कन्हान : - कन्हान शहरातील स्वामी विवेकानंद नगर , प्रभाग क्रमांक ८ येथे गेल्या दोन वर्षांपासुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे . या गंभीर समस्येबाबत शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते हरिष तिडके यांनी वेकोलि कामठी उपक्षेत्रीय प्रबंधक यांना निवेदन देऊन तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे .


कन्हान - पिपरी नगर परिषद अंतर्गत स्वामी विवेकानंद नगर परिसरात सुमारे ३ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी असुन गेल्या दहा वर्षां पासुन वेकोलि प्रशासनाकडुन या टाकीसाठी फिल्टर प्लांटसह पाणीपुरवठा करण्यात येत होता . मात्र मागील दोन वर्षांपासुन हा पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे .

Drinking water issue on the agenda in Kanhan-Piprit

निवेदनात नगरसेवक तिडके यांनी नमुद केले आहे की , कन्हान - पिपरी परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात तीन ते चार महिने तीव्र पाणीटंचाई भासते . आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याने ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे . करिता नागरिकांच्या आरोग्या चा प्रश्न निर्माण होऊ नये , यासाठी बंद असलेला पाणी पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावी , अशी मागणी त्यांनी केली आहे .


निवेदनाची प्रत कामठी उपक्षेत्रिय सिव्हिल विभागाला देखील माहितीस पाठविण्यात आली आहे .  प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल , दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलना चा मार्ग अवलंबण्यात येईल , असा इशारा नागरिकां कडुन दिला जात असुन वेकोलि प्रशासन या मागणी वर काय निर्णय घेते , याकडे संपूर्ण कन्हान - पिपरी शहराचे लक्ष लागले आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या