कन्हान मध्ये संत गाडगे बाबा जयंती उत्साहात साजरी
पत्रकार बांधवांचा सत्कार , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन
कन्हान : - कन्हान शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने महान संत थोर कीर्तनकार आणि समाज प्रबोधनाचे अखंड दीप असलेले वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आणि शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पाडला .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित वरिष्ठ पत्रकार एन.एस.मालविय यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले . तसेच स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे आणि मार्गदर्शक अजय त्रिवेदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटा चे मौनधारणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . वरिष्ठ पत्रकार एन.एस. मालविय व माजी उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांनी महान संत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त करित त्यांनी केलेले कार्य आपल्या आचरणात आणण्याचे आवाहन केले .
यावेळी कन्हानचे पत्रकार एन एस मालविये , अजय त्रिवेदी , मोतीराम रहाटे , सुनील सरोदे , ऋृषभ बावनकर , किशोर वासाडे , रमेश गोळघाटे , मोहन रंगारी , विवेक पाटील , दिनेश नानवटकर , सुर्यभान फरकाडे , आकाश पंडीतकर , धनंजय कापसीकर , मोहन रंगारी , रविंद्र दुपारे , विमल त्रिपाटी सह इतरही पत्रकाराना पेन डायरी व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लाडेकर यांनी केले .
Sant Gadge Baba Jayanti celebrated with enthusiasm in Kanhan
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
नागपुर ग्रामीण जिल्हा महासचिव अशोक पाटील , जिल्हा उपाध्यक्ष संगीत भारती , विनायकराव वाघधरे , संदीप कभे , स्वप्नील वाघधरे , सुनील लाडेकर , सम्राट पगारे , रोहित मानवटकर , रजनीश मेश्राम , राजेंद्र हटवार , हरीश खंगारे , अजय लोंढे , महेन्द्र चव्हाण , मनोहर मेश्राम , मुकेश करसोलिया , चेतन आंबिलडुके , नारायण गजभिये , राहुल सोनबरसे , माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर , संगीता खोब्रागडे , स्वाती पाठक , शशिकला बागडे , शुकेशनी बागडे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या