रेल्वे अपघातील ५७ निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली
नागपुर - रामटेक लोकल रेल्वे अपघाताला २१ वर्षे
Heartfelt condolences to the 57 innocent citizens who lost their lives in the train accident.
कन्हान : - ३ फेब्रुवारी २००५ रोजी नागपुर - रामटेक लोकल रेल्वे गाडीने लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला . या अपघातात ५७ निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यु झाला . या रेल्वे अपघाताला २१ वर्षे पूर्ण झाले . नागपुर जिल्ह्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे . रेल्वे क्रॉसिंगवर गेट व सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे ही धक्कादायक घटना घडली होती . मंगळवार (दि.३) फेब्रुवारी रोजी अपघातातील ५७ निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
कांद्री ते बोरडा रस्त्या वरील नागपुर - रामटेक रेल्वे क्रॉसिंगवर झालेल्या अपघाता च्या स्मृति दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून मौन पाळत मृतांच्या स्मृतींना उजाळा दिला . अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण कांद्री येथील लग्नाच्या आनंदात सहभागी होऊन परत निघाले होते , मात्र एका क्षणात आनंदाचे वातावरण शोकात परिवर्तित झाले , अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली .
“रेल्वे क्रॉसिंगवर गेट व आवश्यक सुरक्षा उपाय नसल्यामुळे हा अपघात घडला . भविष्यात अश्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस व कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात ,” अशी मागणी यावेळी करण्यात आली .
या श्रद्धांजली कार्यक्रमास संजय सत्यकर , दयाराम भोयर , सुजीत पानतावने , अतुल हजारे , सुभाष तडस , भगवानदास यादव , शांताराम जळते , नेवालाल पात्रे , धर्मेंद्र सरोदे , शैलेश शेळके , उमाशंकर सिंह , शिवाजी चकोले , श्रीराम चकोले , सूर्यभान चकोले , विशाल भूते , पवन कुंभलकर , निलखंठ मस्के , राजू गुडधे , कैलाश काकडे , वशिष्ठ यादव , नितीन वानखेडे , अजय त्रिवेदी , विमल त्रिपाठी , ऋषभ बावनकर , चंद्रशेखर बावनकुळे , श्रीराम नांदुरकर , मधुकर बंड , दिनेश राऊत , जयराम सोनेकर , संजय मनवटकर , एकनाथ आबाळकर , गेंदलाल सरोदे , बलविंदर सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .
या भीषण अपघाताने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असुन आजही त्या घटनेची आठवण मन हेलावुन टाकणारी आहे . रेल्वे क्रॉसिंगवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर असुन रेल्वे प्रशासनाने तातडीने या स्थळी उडाणपुल बनविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या