सहारा हेल्प फॉर यु फाउंडेशनच्या वतीने युवा दिवस उत्साहात साजरा
कन्हान : - सहारा हेल्प फॉर यु फाउंडेशनच्या वतीने युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त डागा बाल सदन , कामठी येथे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन युवा दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
या उपक्रमांतर्गत बालसदनातील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून समाजकार्य विद्यालयाचे प्रा.डॉ.मनोज होले , डॉ. मनीष मुळे सर तसेच डागा बाल सदनचे अधिक्षक मा.लुटे सर , अधीक्षिका सरोज गायकवाड़ यांची उपस्थिती लाभली .
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व विशद करून , समाजघडणीमध्ये अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले .
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सतीश उके , सचिव संजय रंगारी , मनीष शंभरकर , सोनु खोब्रागडे , किशोर राऊत , विश्वदीप पानतावणे , संदीप गजभिये , योगेश मोहाडे , योगेश गडे इत्यादि उपस्थित होते .
या उपक्रमात सहारा हेल्प फॉर यू फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटिल यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश उके यांनी मानले .
*सह संपादक - ऋषभ बावनकर*


0 टिप्पण्या