Advertisement

थोर समाजसेविका , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी

थोर समाजसेविका , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी


कन्हान  : - कन्हान मध्ये ठिकठिकाणी थोर समाजसेविका , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी करण्यात आली .


बहुजन समाज पार्टी , रामटेक विधानसभा

बहुजन समाज पार्टी , रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमात रिपब्लिकन सांस्कृतिक संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सावित्रीबाईंच्या शैक्षणिक आणि सामाजिक संघर्षावर प्रकाश टाकण्यात आला . दहा वर्षांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची निस्वार्थपणे साफसफाई करणाऱ्या अमिताताई दहिवलकर यांचा चंद्रशेखर भिमटे व इतर मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजेश फुलझेले , नितिन मेश्राम , महादेव पाटील , अल्पेश मेश्राम , दिवाळू मेश्राम , यशवंत तांबे , निशांत मोटघरे , नरेश चिमणकर , ठमके गुरुजी , अभिजित चांदूरकर , विवेक पाटील , दहाटे मॅडम , अमिता दहिवलकर , अर्चिता फुलझेले , साधना सूर्यवंशी , अर्चना चव्हाण , कुसुम पाटील , नंदा टेंगुरणे यांचा सह अनेक कार्यकर्ते , उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते .

The-birth-anniversary-of-the-great-social-reformer,-Krantijyoti-Savitribai-Phule,-was-celebrated-with-great-fanfare

सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा , कन्हान

कन्हान परिसरातील सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती चे औचित्य साधुन महिला मुक्ती दिवस साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष कन्हान - पिपरी नगरपरिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे , प्रमुख पाहुणे नगरसेवक केतन भिवगडे , नगरसेवक शिवशंकर ऊर्फ चिंटु वाकुडकर , नगरसेविका पुनम राठी , मुख्याध्यापक गौरीशंकर साठवणे , शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष  सौ.दुर्गा बागडे सह आदि मान्यवरांचा हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमात मान्यवर व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिक्षिका शोभा पारधी मॅडम यांनी केले आणि आभार प्रदर्शन मंगला बावनकुळे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका प्रिया जांभुळकर , शोभा पारधी , मंगला बावनकुळे , सोनाली धोटे , अश्विनी वालदे सह आदि कर्मचारी यांनी सहकार्य केले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या