कन्हान : - भारत देशाच्या प्रथम महिला शिक्षिका थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कन्हान परिसरात विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान
श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक नरेंद्र वाघमारे आणि वंदना रामापुरे (सह संचालिका) यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . नरेंद्र वाघमारे यांनी विद्यार्थांना सावित्रीबाई फुले यांचा जीवन चरित्र्यावर मार्गदर्शन केले . वंदना रामापुरे यांनी सावित्रीबाई बनून आलेल्या मुलीचे कौतुक केले . कार्यक्रमाची प्रास्ताविक पवन ठमके यांनी केले तर आभार प्रदर्शन नेहा गायधने यांनी केले . कार्यक्रमात अभिषेक मोहनकर , भास्कर सातपुते , गीता वंजारी , जयश्री पवार , कीर्ती वैरागडे , योगिता चांदेवार सह आदि शिक्षक , शिक्षिका उपस्थित होते .
*कन्हान - पिपरी ढिवरापुरा आंगनवाडी क्रमांक १२६*
कन्हान - पिपरी ढिवरपुरा येथील आंगनवाडी क्रमांक १२६ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ला अभिवादन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नवनिर्वाचित नगरसेविका आशा माहतो यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . आंगनवाडी सेविका सुनिता मानकर यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन चरित्र्यावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले . उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन अभिवादन केले .
*केडीके काॅन्व्हेंट शाळा , टेकाडी*
टेकाडी परिसरातील केडीके काॅन्व्हेंट शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती थाटात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संचालक अविनाश कांबळे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . सामाजिक कार्यकर्ता लाकेश्वर वासाडे , मुख्याध्यापिका निशा देशमुख , शिक्षिका मनीक्षा काबंळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थांना मार्गदर्शन केले . या प्रसंगी सुरेखा कांबळे , अर्चना कारेमोरे , अर्पणा गजभिए , रीना राम आदि शिक्षक वृंद , विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या