Advertisement

विकास हायस्कुल कन्हान येथे माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळा थाटात संपन्न


विकास हायस्कुल कन्हान येथे माजी विद्यार्थी स्नेह मिलन सोहळा थाटात संपन्न


वर्गमित्र सचिन अल्लडवार आपल्याच शाळेत मुख्याध्यापक झाल्याने विशेष सत्कार केला. 

कन्हान : - विकास हायस्कुल कन्हान च्या १९८६-८७ दहावी पर्यंत सोबत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यी वर्गमित्र , मैत्रिणींनी शालेय जिवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत विविध कार्यक्रमासह अस्मर्णिय स्नेहमिलन सोहळा बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान येथे थाटात संपन्न झाला .

रविवार (दि.१८) जानेवारी २०२६ ला सकाळी ११ वाजता बळीरामजी दखने हायस्कूल कन्हान येथे वर्गमित्र स्नेह मिलन सोहळया निमित्य माजी विद्यार्थ्यी वर्गमित्रांच्या आगमणार्थ पुष्प देऊन स्वागत करित नोंदणी करून नास्ता , चाय झाल्यावर ११.३० वाजता शाळेची घंटा वाजताच सर्व वर्गमित्रांनी शालेय प्राथना करून शाळेचे मुख्याध्यापक सचिन अल्लडवार सर , माजी विद्यार्थ्यी मोहन यादव , सुनिल ठाकरे , सुभाष अढाऊ आदिंच्या हस्ते महापुरूषांच्या तसेच शाळेचे संचालक स्व.बळीरामजी दखने आणि त्कालीन माजी मुख्याध्यापक स्व.बलवंतजी थटेरे सर यांच्या प्रतिमेचे पुजन करित पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . सर्व प्रथम स्वर्गवासी गुरूजन , वर्गमित्र यांना दोन मिनिट मौनधारण करून श्रध्दाजंली अर्पन करण्यात आली . 


माजी विद्यार्थीनी , काटोल येथे मुख्याध्यापिका असलेल्या रविदिनी भक्ते यांनी स्वत:चा परिचय देत प्रास्ताविकातुन शालेय जिवनातील प्रसंगाचे वर्णन करीत आपल्या विकास हायस्कूल आणि गुरूजनाचा गौरव करीत शालेय जिवनाचे शब्दरूपी चित्रण प्रगट केले . त्यानंतर मंचकावर एक , एकाने येऊन सर्व वर्गमित्र , मैत्रिणींनी शालेय जिवनातील आठवणींना उजाळा देत भावभिन आपला परिचय सांगितला. दुपारी २.१५ वाजता मा.पी.पी पोतदार सर , मा. एन. एस.मालविये सर , मा.तेजराम गजभिये सर , मा.एस.जी मंडपे सर , मा.वेणुताई बारई मँडम आदी गुरूजनांचा माजी वर्गमित्र , मैत्रिणींनी संविधान पुस्तिका , स्मृतीचिन्ह , पुष्पहारानी स्वागत , सत्कार करून आशिर्वाद घेतला . तसेच याच शाळेत शिक्षण घेऊन मुख्याध्यापक पद भुषविणारे वर्गमित्र मा.सचिन अल्लडवार सर यांचे आयोजन समिती व्दारे संविधान पुस्तिका , स्मृती चिन्ह , पुष्पगुच्छानी विशेष सत्कार करून सर्वानी सोबत स्नेह भोजनाचा आंनद घेतला . 


दुपारी ३ वाजता सर्व माजी विद्यार्थी आपआपल्या वर्गात बसुन मा.पोतदार सर , मंडपे सर व गजभिये सरांनी गणिताचा वर्ग घेऊन ३९ वर्षी पुन्हा शिकवुन उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या . अर्धा तास मैदानी खेळ , सुमधुर गित गायन करून टाळयांचा वर्षाव करून घेतला . त्यानंतर सर्व वर्गमित्र , मैत्रिनींना शाळे व्दारे सन्मानपत्र , आयोजन समिती तर्फे पुष्प व स्मृती चिन्ह बहाल करण्यात आले . चाय , बिस्किट खात सर्वाशी गप्पा , गोष्टी करीत भावविभोर होत मंत्रमुग्ध होऊन स्नेह मिलन सोहळा थाटात संपन्न केला . विकास हायस्कुल कन्हान च्या १९८६-८७ दहावी वर्गमित्र स्नेह मिलन सोहळयाचे सुंदर सुत्रसंचालन मनोज बागडे यांनी केले आणि आभार मोतीराम रहाटे यानी व्यक्त केले . कार्यक्रमात १२१ वर्गमित्र सहभागी झाले असुन बहुसंख्येने वर्गमित्र सह परिवार उपस्थित झाले होते . 


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजन समितीचे सचिन अल्लडवार , मोतीराम रहाटे , मोहन यादव , संभाजी मस्के , मनोज बागडे , रामेश्वर सवाईतुल , सुरेश वंजारी , रंगराव पोटभरे , दिलीप डांगे , नितीन वानखेडे , देवचंद कुंभलकर , दिलीप टिकले , चंद्रशेखर घोटेकर , शरद कावडकर , अनिल डोंगरे , रोशन राऊत , भगवान भोवते , राधेशाम ठाकरे , योगीराज रंगारी , संध्या नेवारे (वाघाडे ), मंजुषा खोब्रागडे (मेश्राम) , ज्योती हिवसे (भडंग) , विद्या भजभिये (चांदुरकर) , सुनिता भोयर (डेंगे) शालीनी भेलावे (रामटेके) , पुष्पा मसार (मोरे) , शिला मेश्राम , मंगला ठाकरे (वाघ) , अर्शिला शेंडे (बन्सोड) , भागेरथा काकडे (सोनट्टके) , शारदा मंडपे (चौधरी) , पुष्पा जगंम (यावले) , संगिता गिरडकर (भुजाडे) , अर्चना मेश्राम (गजभिये) , सिंधु खोब्रागडे (चांदेकर) , मालु इटनकर (तलमले) आदीसह वर्गमित्र , मैत्रिनींनी सहकार्य केले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या