Advertisement

ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे वीरमाता व कन्हानवासीयांचा सत्कार


ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे वीरमाता व कन्हानवासीयांचा सत्कार


कन्हान : - ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे कार्यकर्ता मेळावा तसेच राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . बुधवार (दि.७) जानेवारी रोजी हरिहर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज , पारशिवनी येथे पार पडला . कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक गीताने करण्यात आली .


या वेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे विदर्भ प्रांत अध्यक्ष शामकांत पात्रीकर , विदर्भ प्रांत संघटक डॉ.कल्पना उपाध्याय , प्रवासी महासंघ अध्यक्ष नितीन मुकेवार , स्वाती मुकेवार , ग्राहक पंचायत महाराष्ट्र नागपूर ग्रामीण अध्यक्ष कांचनमाला माकडे , नागपूर ग्रामीण सचिव नथुजी वाढरे , संपर्क प्रमुख विधी जयस्वाल , रामटेक तालुका अध्यक्ष मोरेश्वर माकडे , सहसचिव भावना क्षीरसागर सह आदी मान्यवर उपस्थित होते .


कार्यक्रमात कन्हान शहरातील शहीद वीर प्रकाश देशमुख यांच्या मातोश्री आई लीलाताई देशमुख , तसेच बंधू प्रदीप देशमुख यांचा पुष्पगुच्छ , शाल व ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे सन्मानचिन्ह देऊन हृदय सत्कार करण्यात आला . देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानाच्या कुटुंबीयांचा सत्कार करताना उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमान व कृतज्ञतेची भावना दिसून आली . या प्रसंगी कन्हान शहरातील सामाजिक कार्यकर्त्या व डॉक्टर स्वाती वैद्य यांचा रुग्ण हक्क संहितेनुसार रुग्णांना प्रामाणिक सेवा देत असल्याबद्दल गौरव करण्यात आला . तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संताजी अखिल तेली सामाजिक संघटनेचे नागपूर जिल्हा प्रचार प्रमुख सूर्यभान चकोले यांचाही सत्कार करण्यात आला . विविध क्षेत्रांत नेतृत्वगुण दाखविणाऱ्या पारशिवनी तालुका अंगणवाडी सेविका अध्यक्ष सुनिता मानकर तसेच रास्त भाव दुकानदार स्वप्निल मानकर यांनाही ग्राहक पंचायत महाराष्ट्रतर्फे सन्मानित करण्यात आले .

कार्यक्रमात विष्णू डहाके , श्रीराम सातपुते , पारस माकडे , बबिता कोठेकर , कैलास वाडीभस्मे , नीता इटनकर , मीना इंदूरकर , श्री कांबळे , प्रवीण चव्हाण , केशव केने यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे कार्यकर्ते , साधक , शिक्षक व हरिहर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या