Advertisement

माजी सैनिक आणि समता सैनिक दल यांचा संयुक्त विद्यमाने शौर्य दिवस कार्यक्रम |


माजी सैनिक आणि समता सैनिक दल यांचा संयुक्त विद्यमाने शौर्य दिवस कार्यक्रम


कन्हान : - कन्हान शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माजी सैनिक आणि समता सैनिक दल कन्हान यांचा संयुक्त विद्यमाने गुरवार (दि.१) जानेवारी रोजी शौर्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित माजी सैनिक पंजाब पाटील  , जयवंत गटपाडे यांचा हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करण्यात आले . तसेच बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी जयवंत गटपाडे , पंजाब पाटील , सम्राट पगारे यांनी भीमा कोरेगाव ऐतिहासिक लढाई बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित समाज बांधवांनी महार सैनिकांच्या समर्थनात विजयस्तंभाला मानवंदना देऊन लढाईत शहिद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .

समता सैनिक दल चे जी.ओ.सी. खांडेकर, अनिता दुपारे,कल्पना फुलझेले, सिंघू वाघमारे, दुर्गा गजभिये, मानुकला वाघमारे,अनिता तांबे, कमला गाड्पायाले, सुरेखा देशभ्रतार,  किरण भेलावे, रेखा भेलावे, 

या प्रसंगी माजी सैनिक जयवंत गटपाडे , सम्राट पगारे , विलास मेश्राम , पंजाब पाटील , नाकसेन मानकर , पदमाचंद पुंचभाई , इंद्रपाल कांबळे , दिलीप तायडे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.



सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या