Advertisement

नगर कॉग्रेस कमेटी कन्हान द्वारे प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा


नगर कॉग्रेस कमेटी कन्हान द्वारे प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा 


कन्हान: - भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिवस निमित्त गांधी चौक कन्हान येथे नगर कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .


कार्यक्रमाचे अध्यक्ष पारशिवनी तालुका अध्यक्ष दयाराम भोयर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन सत्य , अहिंसा व देशसेवेच्या विचारांना अभिवादन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली . याप्रसंगी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील मूल्ये स्वातंत्र्य , समता , बंधुता व न्याय जपण्याचा आणि त्यावर चालण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी केला . कन्हान शहर नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनय यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . 


या प्रसंगी प्रमुख्याने डॉ.प्रकाश बोंदरे , नप माजी उपाध्यक्ष योगेंद्र (बाबु) रंगारी , मनिष भिवगडे , नगरसेविका व गटनेता रेखाताई टोहने , नगरसेवक शमशेर पुरवले , कमलेश मेश्राम , दिनेश ढोके , उमेश यादव , धर्मपाल बागडे , गौतम नितनवरे, गौरव माहोरे, रोहित बर्वे , चंद्रशेखर बोरकर , प्रदीप बावने , प्रशांत मसार , पुष्पाताई भिलावे , दर्शना तिडके , महेश ढोंगडे , शैलेश माटे , प्रविण गोडे , अर्जुन पात्रे , जस्मिन लाडे , आनंद चकोले , कुणाल खडसे आदीसह अनेक मान्यवर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

The Republic Day was celebrated grandly by the Nagar Congress Committee, Kanhan.

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या