जिजाऊ ब्रिगेड कन्हान द्वारे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात
कन्हान : - जिजाऊ ब्रिगेड कन्हान शहर च्या वतीने सोमवार (दि.१२) जानेवारी रोजी योगभवन, हनुमान नगर येथे राष्ट्रमाता,राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , प्रमुख पाहुणे भाविकाताई रामटेके (निवृत्त अधिकारी, इंडियन ब्यूरो ऑफ माईन्स) व मंदालाई बागडे (निवृत्त शिक्षिका) प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली . त्यानंतर जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली . प्रास्ताविकात जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मायालाई इंगोले यांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला .यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेविका पूनमलाई राठी यांचा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला . प्रमुख अतिथी भाविकाताई रामटेके यांनी जिजाऊ जयंतीनिमित्त मार्गदर्शन केले . तसेच त्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली .
यावेळी उमके मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला . या यशस्वी सादरीकरणासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या सचिव छायाताई यांनी विशेष परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती घोटेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रिती कुकडे यांनी केले.
कार्यक्रमात महिला, नागरिक व जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलका कोल्हे , लता जळते , सुनिता येरपुडे , गोदावरी नागर , माया भोयर , सुरेखा आच्छर , येलेकर ताई , मिनाक्षी भोयर , सुषमा बाले , मनीषा धुडस , वर्षा जुळे , संगीता बावनकुळे , सुधा सव्वालाखे , अनिता पाजुणे आदी जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या