गजानन महाराज पालखी यात्रेचे कन्हान - कांद्री परिसरात जल्लोषात स्वागत
कन्हान : - श्री संत गजानन महाराज सेवा समिती , तीन खंबा चौक , नागपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्री गजानन महाराजांची नागपुर ते रामटेक पायी पालखी दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले .
शनिवार (दि. ३) जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता श्रींची आरती, पूजा - अर्चाना करून पालखीचे प्रस्थान श्री हरिहर गजानन निवास, टीमकी, तीन खंबा चौक, नागपूर येथून झाले . प्रेमनगर येथील गजानन महाराज मंदिर, भवानी माता मंदिर (कळमना) मार्गे पालखी कामठी येथे दाखल झाली . मोदीराम मंदिर येथे कामठी वासीयांच्या वतीने दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली . त्यानंतर प्रवचन व अल्प विश्रांतीनंतर पालखी कन्हान च्या दिशेने रवाना झाली .
महामार्गाने प्रवास करीत पालखी जुना आडा पुलिया कन्हान नदी परिसरात पोहोचताच सनातनी धार्मिक संस्था च्या वतीने फुलांचा वर्षाव , फळांचे वितरण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले . यावेळी शुभम बावनकर, विनोद यादव , आयुष संतापे , हिमांशु सावरकर, सुर्या संपाते, आर्यन संतापे, वेदांत बावनकुळे आदी नागरिक उपस्थित होते .
यानंतर पालखी काली माता सत्रापुर येथे पोहोचली. मॉ काली माता सेवा ट्रस्ट, सत्रापुर - कन्हान यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले . कीर्तन, महाप्रसादानंतर पालखीचा मुक्काम सत्रापुर येथे करण्यात आला .
रविवार (दि. ४) जानेवारी रोजी सकाळी काली माता मंदिरात पूजा - पाठ करून पालखीचे पुढील प्रस्थान झाले . राष्ट्रीय महामार्गाने गणेशनगर , हनुमाननगर , गजानन महाराज मंदिर तिवाडे ले-आऊट येथून पांधन रोडने कन्हान नगराची प्रदक्षिणा करण्यात आली . काकडे निवास येथे चहा - नाश्ता व विसाव्याची व्यवस्था करण्यात आली .
गजानन महाराज पालखी दिंडी यात्रा कांद्रीकडे मार्गस्थ होत असतांना जय शीतला माता मंदिर, मेन रोड, कांद्री येथे फुलांचा वर्षाव, फळे, राजगिरा पापडी वितरण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले . यावेळी पूजा-अर्चा करून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला . या प्रसंगी संजय चौकसे, वामन देशमुख, मनोज मरघडे, हंसाबेन पटेल, जयश्री मरघडे, कीर्ती हटवार, लता बावनकुळे, अरुणा हजारे, स्नेहा रक्षक, जयराम मेहरकुळे, हिरालाल बिहुणे, राजू देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, महेश मंगतानी, ओमदास लाडे आदी उपस्थित होते.
The Gajanan Maharaj palanquin procession was welcomed with great enthusiasm in the Kanhan-Kandri area.
महामार्गावर भारत माता चौक येथील आशीर्वाद मंगल कार्यालयासमोरही पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी कांद्री नगर पंचायत नगराध्यक्ष सुजित पानतावणे, भाजप जिल्हा महामंत्री अतुल हजारे, नरहरी पोटभरे, शिवाजी चकोले, सौरभ पोटभरे, रोहित चकोले, उमेश वाडीभस्मे, पराग पोटभरे, धर्मेंद्र सरोदे, विष्णू सरोदे, देवेंद्रसिंह सेंगर, दिनेश खाडे, दिनेश राऊत, इंद्रपाल सुखदेवे, रविंद्र कोतपल्लीवार, प्रफुल हजारे, विजय पोटभरे, रोहित पानतावणे, शैलेन्द्र सावनेरे, कशिश पानतावणे, अरुणा हजारे, सविता राऊत, माधुरी मस्के, आरती कोतपल्लीवार, संघमित्रा डोंगरे, आरती चकोले, भारती पोटभरे, अंजली सिंह, गायत्री यादव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
संपूर्ण प्रवासात “गण गण गणात बोते”च्या जयघोषाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. शिस्तबद्ध दिंडी, कीर्तन, प्रवचन व सेवाभावी उपक्रमांमुळे ही पालखी यात्रा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणारी ठरली .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या