सत्रापुर परिसरात ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
राष्ट्रीय मांग गारोडी क्रांतीसेना व एम.जी.एस संविधानिक हक्क संघटन यांचे संयुक्त कार्यक्रम
कन्हान : - सत्रापुर परिसरात राष्ट्रीय मांग गारोडी क्रांतीसेना व एम.जी.एस संविधानिक हक्क संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा प्रजासत्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त माजी सैनिक जयवंत गटपाडे , प्रमुख पाहुणे नगरसेवक समशेर पुरवले , नगरसेविका निजी तेलोटे , गणेश भालेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . माजी सैनिक जयवंत गटपाडे यांचा हस्ते ध्वजारोहण करुन तिरंगा झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले . मान्यवरांनी प्रजासत्ताक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे संचालन आणि आभार राष्ट्रीय मांग गारोडी क्रांतीसेना सचिव अर्जुन पात्रे यांनी केले.
The 77th Republic Day was celebrated with enthusiasm in the Satrapur area.
या प्रसंगी जेष्ठ नागरिक भरत सावळे , रामेश्वर शेंडे , राजन भिसे , देविदास खडसे , दलजित पात्रे , देवानंद पेटारे , अनिल लोंढे , प्रीतम शेंडे , महेश लोंढे , जैन इंचुरकर , दिपचंद शेंडे , ऋषभ बावनकर , अरविंद लोंढे , डबलु खडसे , शशिकांत दारुडे , रामुजी खडसे , अजय लोंढे , नरेश हातगाडे , राजेश भोपुलकर , अभय पेटारे , सावन लोंढे , मंगेश पात्रे , उषा पात्रे , अनिता लोंढे , शिला पात्रे , सुदेश शेंडे , भाटिया पात्रे , राजेश उफडे , शंकर शेंडे , मुरली पात्रे , राज भिसे , नितीन भिसे , अनुज खडसे , संदिप शेंडे , सावन पात्रे , नितेश पात्रे , योगेश लोंढे , अरुण पात्रे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या