Advertisement

यशवंत विद्यालय वराडा शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा


यशवंत विद्यालय वराडा शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा


कन्हान : - यशवंत विद्यालय वराडा येथे शाळेचे संचालक भुषणराव निंबाळकर यांचे अध्यक्षेत आणि ग्रा.प.वराडा सरपंच सुनिल जामदार यांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहन करण्यात आले . 


यावेळी पोलीस पाटील संजय नेवारे , जेष्ट नागरिक नारायण टाले , माजी विद्यार्थी क्रीश ठाकरे , सौरभ ब्रम्हाणकर , पुर्वेश पारधी आदी प्रामुख्याने उपस्थित होते . शाळेच्या मुख्याध्यापिका के.बी निंबाळकर यांनी प्रास्ताविकातुन प्रजासत्ताक दिनाचे महत्व आणि शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमा विषयी सांगितले . त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीत गीतावर डमलेस व कवायत सादर केली . कार्यक्रमाचे सूत्र संचालन राकेश गणविर यांनी केले आणि आभार प्रदर्शन सतिश कुथे सर यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजेंद्र गभणे सर , अर्चना शिंगणे , कु.पायल कोटरूंघे , मोतीराम रहाटे , दिपक पांडे सह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले . 

The 77th Republic Day was celebrated with enthusiasm at Yashwant Vidyalaya Varada school.

सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या