कन्हान मध्ये २०८ वा भीमा - कोरेगाव शौर्य दिवस उत्साहात साजरा
कन्हान : - कन्हान शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवार (दि.१) जानेवारी रोजी भीमा - कोरेगाव विजयस्तंभाचा २०८ वा वर्धापन दिन 'शौर्य दिन' म्हणून अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला . या निमित्ताने मोठ्या संख्येने आंबेडकरवादी अनुयायांनी एकत्र येत वीर योद्ध्यांच्या शौर्याला अभिवादन केले .
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . उपस्थित जनसमुदायाने दिलेल्या 'जय भीम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता . कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सांस्कृतिक संघ (RSS) चे संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रशेखर भिमटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला .
कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे आणि कन्हान - पिपरी नगर परिषदचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते . मान्यवरांनी आपल्या भाषणात भीमा - कोरेगावचा इतिहास हा स्वाभिमान आणि न्यायाचा विजय असल्याचे सांगितले .
या प्रसंगी कन्हान - पिपरी नगर परिषद नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका आणि शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . समाजातील विविध स्तरांतील लोकांनी विजयस्तंभाच्या शौर्याचे स्मरण करत मानवंदना दिली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन रिपब्लिकन सांस्कृतिक संघ , महाराष्ट्र प्रदेशचे प्रसिद्धी प्रमुख नितीन मेश्राम यांनी केले आणि आभार प्रदर्शन समाजसेवक मनोज गोंडाणे यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजेश फुलझेले , आनंद चव्हाण , रुपेश मेश्राम , दिवाळू मेश्राम , रोशन मेश्राम आणि इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले .
The 208th Bhima-Koregaon Valour Day was celebrated with great enthusiasm in Kanhan.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या