Advertisement

आदर्श हायस्कूल कन्हान येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा


आदर्श हायस्कूल कन्हान येथे ध्वजारोहण व विविध कार्यक्रमाने प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा


कन्हान  : - आयडियल एज्युकेशन सोसायटी कन्हान संचालित आदर्श हायस्कूल कन्हान व आयडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळेत संस्था सचिव भरत साळवे यांच्या अध्यक्षतेत व प्रमुख पाहुणे कन्हान नगर परिषद उपाध्यक्ष रिकेंश चवरे, नगरसेवक शक्ती पात्रे यांचा प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करुन ७७ वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . विद्यार्थ्यांनी देश भक्तीवर गीतांच्या माध्यमातुन रंगारंग कार्यक्रम सादर केले . संस्थेचे सचिव भारत साळवे यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . 

मुलांनी स्वातंत्र्य लढा आणि भारतीय राज्यघटनेबद्दल आपले विचार व्यक्त केले . ज्येष्ठ शिक्षक सोळंकी सर आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका लता पेटकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले . भरत साळवे यांनी सर्व विद्यार्थ्यांना देशभक्तीची भावना बाळगण्याचे आवाहन केले . संस्थेचे सहसचिव नीता मेश्राम , सदस्या छाया मिसार , सदस्य घवघवेजी यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्या र्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले . राष्ट्रगीत गाऊन व मुलांना मिठाई वाटुन कार्यक्रमाची सांगता केली . 

Republic Day was celebrated with enthusiasm with flag hoisting and various programs.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श हायस्कुल कन्हान चे मुख्याध्यापक गिरजाशंकर यादव यांनी केले. संचालन मनोज डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन चापले सर यांनी केले. यशस्वितेकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां नी परिश्रम घेतले .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या