Advertisement

कन्हान येथे भव्य रक्तदान शिबिराने प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा |


कन्हान येथे भव्य रक्तदान शिबिराने प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा


मानवाधिकार संरक्षण संघटनेचा सामाजिक उपक्रम , नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 


कन्हान : -  मानवाधिकार संरक्षण संघटना व्दारे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन कन्हान शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असुन अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली .


रक्तदान शिबिरात मेट्रो ब्लड बँक व डागा हॉस्पिटल , नागपुर यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले . शिबिराच्या माध्यमातुन रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित झाले असुन गरजु रुग्णांसाठी आवश्यक रक्तसाठा उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली . रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असुन प्रत्येक सुदृढ नागरिकाने वर्षातुन किमान एकदा रक्तदान करावे , असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले आहे .

Republic Day was celebrated with enthusiasm in Kanhan with a grand blood donation camp.

याप्रसंगी पत्रकार मोतीराम रहाटे , कमल यादव , सुनिल सरोदे , ऋषभ बावनकर , मोहम्मद शफीक शेख यांचा मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छाने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले . जन हिताच्या उपक्रमांना योग्य प्रसिद्धी देणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचे आयोजकांनी विशेष कौतुक केले .


पत्रकार हे समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम असुन सामाजिक चळवळींना बळ देण्याचे कार्य ते सातत्याने करीत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले . रक्तदान शिबीर मानवाधिकार संरक्षण संघटना नागपुर जिल्हा अध्यक्ष पंकज रामटेके यांनी आयोजन करून यशस्वितेकरिता मनिष नंदेश्वर , प्रमोद चंद्रिकापुरे , सुमेध नितनवरे , रजनिश मेश्राम , ओमप्रकाश गुरधे , प्रणय बावनकुळे , शैलेश तांडेकर , बादल भेलावे , बबलु अन्सारी , प्रकाश गाते , राजेश आपुरकर , मिना रामटेके , सविता नाटकर , रीना चौबे , मीना कुंभलकर , अर्चना शर्मा , निमा लुहुरे , गंगादिप सहारे , लक्ष्मी गाते , शालुताई , दीक्षा चनकापुरे आदी सह मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या पदाधिकारी, कार्यक्रत्यानी विशेष परिश्रम घेतले .


सदर रक्तदान शिबिरामुळे समाजात मानवतेचा , एकोप्याचा व सेवाभावाचा संदेश पोहोचला असुन अशा उपक्रमांमुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले . नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम यशस्विरित्या संपन्न झाला .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या