महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, कन्हान येथे प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा
कन्हान : - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्र.एक अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष ऋषभ बावनकर , प्रमुख पाहुणे आशिष बागडे , जगन कारेमोरे , शंकर कारेमोरे , कैलास राऊत , सामजसेविका वनिता कावळे , रंजना भोयर आदि मान्यवरांचा हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी , विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . ऋषभ बावनकर यांचे हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वज तिरंगा झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले .
मान्यवरांनी प्रजासत्ताक दिवसावर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . मुलांना मिठाई वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे संचालन आणि आभार रंजना पौनिकर हयांनी केले .
Republic Day was celebrated with enthusiasm at the Maharashtra Labour Welfare Centre, Kanhan.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रेमा कावळे, संध्या सहारे, वैशाली इंगुळकर यांनी परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या