Advertisement

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे साजरी


राष्ट्रमाता जिजाऊ जयंती ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे साजरी


कन्हान : - राष्ट्रमाता , राजमाता जिजाऊ मॉ साहेबांची जयंती ग्रामीण पत्रकार संघ कन्हान व्दारे मॉ जिजाऊ साहेबांना अभिवादन करुन साजरी करण्यात आली . 

           सोमवार (दि.१२) जानेवारी रोजी ग्रामीण पत्रकार संघ कार्यालय तारसा रोड चौक महाकाली कॉमप्लेक्स कन्हान येथे संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे यांच्या अध्यक्षेत आणि केडीके इंग्रजी शाळा टेकाडी चे संचालक अविनाश कांबळे व बाल शिवबा शिवांश निलेश पंडितकर यांचा हस्ते मॉ.जिजाऊ च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी संघाचे सचिव सुनिल सरोदे यांनी मॉ जिजाऊ च्या मौलिक कर्तव्या विषयी मार्गदर्शन केले . 


कार्यक्रमात ग्रामीण पत्रकार संघ कन्हान चे कार्याध्यक्ष कमलसिंह यादव , पत्रकार ऋृषभ बावनकर , मोहन रंगारी , जयंता कुंभलकर , किशोर वासाडे , आकाश पंडीतकर यांनी प्रामुख्याने उपस्थित राहुन राजमाता जिजाऊ यांना पुष्प अर्पित करुन अभिवादन करीत जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या