सत्रापुर येथे जुगार अड्ड्यावर धाड ; दोघांना अटक
तीन मोबाईल, रोख रकमेसह १२,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान : - कन्हान शहरातील सत्रापुर येथे सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या हार-जीतच्या जुगार अड्ड्यावर कन्हान पोलिसांनी धाड टाकून दोन इसमांना अटक केली . कारवाईत तीन मोबाईल व रोख रकमेसह एकूण १२,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
गुरुवार (दि.१५) जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे स्टाफसह अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असतांना सत्रापुर येथे राजन भिसे यांच्या घरामागील सार्वजनिक ठिकाणी झाडी - झुडपात ५२ ताशपत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार पोलीसांनी तात्काळ धाड टाकली . या कारवाईत रामू गयाप्रसाद यादव (वय ६३) व रमेश लल्ला माहतो (वय ६३, दोघेही रा. कन्हान) यांना अटक करण्यात आली . पंचासमक्ष अंगझडती दरम्यान तीन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १२,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोना आतिश मानवटकर यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस करीत आहेत . सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे , उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे , पोहवा हरिष सोनभद्रे , पोना आतिश मानवटकर , पोशि आकाश सिरसाट , राहुल जाधव , अश्विन गजभिए , अनिल यादव आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली .
Raid on a gambling den in Satrapur; two arrested.
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या