Advertisement

पिपरी - कन्हान ढिवरपुरा आंगनवाडीत मुलांना फळ , बिस्कीट वितरण


पिपरी - कन्हान ढिवरपुरा आंगनवाडीत मुलांना फळ , बिस्कीट वितरण 


महापुरुषांचे प्रतिमा भेट देऊन संयुक्त जन्मोत्सव उत्साहात


कन्हान : - सनातनी धार्मिक संस्था कन्हान शहर च्या वतीने राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जन्मोत्सव निमित्त कार्यक्रमाचे आयोजन पिपरी - कन्हान येथे ढिवरपुरा आंगनवाडीत करण्यात आले .

कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष शुभम बावनकर यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . 

यावेळी ऋषभ बावनकर , वेंदान बावनकुळे यांनी महापुरषांच्या जीवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . तसेच मुलांना फळ , बिस्कीट वितरण करुन आंगनवाडी मदतनीब शारदा मसराम यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले , महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमा भेट देऊन संयुक्त जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले . 

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शुभम बावनकर , विनोद यादव , वेदांत बावनकुळे , प्रथमेश कोल्हे , ऋषभ बावनकर , कृणाल खडसे , रोशन हावरे , अजय गुप्ता , अजय पाली , अमन गुप्ता , अभिषेक मेंदुले , नितेश पाली , अमोल नायडु सह आदि नागरिक उपस्थित होते .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या