Advertisement

अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी तालुक्याची सभा संपन्न |


अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी तालुक्याची सभा संपन्न

पारशिवनी : गावागावांत ग्राहकांना हक्क, कर्तव्ये व फसवणूक यांविषयी जाणीवजागृती  व वातावरणनिर्मिती सातत्याने करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी शाखेचा नेहमीच साखरेचा वाटा राहिलेला आहे.

                नविन वर्षाचे औचित्य साधून पारशिवनी तालुक्यातील ग्राहकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नुकतीच सभा घेण्यात आली. यात पारशिवनी नगरपंचायत क्षेत्रातील स्वच्छता,नालीसफाई,पथदिवे व पाणीपुरवठा तसेच अवैध वाहतूक,शालेय विद्यार्थ्यांसाठी बसेसची कमतरता,विजेचा लपंडाव,सेतूवरील ग्राहकांची लयलूट,आरोग्य विभागातील औषधाची कमतरता व वैद्यकीय उपकरणांची निरूपयोगीता,विविध दुकानदारांची पक्के बिल देण्याची उदासिनता,इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांतील गुणवत्तेचा अभाव व प्रचंड फी वाढ,बळीराजांच्या अनुदानाची व्यथा,तसेच माकडांचा,डुकरांचा व जनावरांचा हैदोस,परवानाधारक मद्य दुकानदारांचा ग्राहकांना एक दिवसीय परवाना न देण्याचा हट्ट ईत्यादी बाबींवरील समस्येवर सभेमध्ये चर्चा होऊन निवेदने देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सदर सभा ही तालुका अ.भा.ग्राहक पंचायतचे अध्यक्ष श्री.विठ्ठलराव गांजरे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

                  सभेची सुरूवात स्वामी विवेकानंदांच्या फोटोला मालार्पण करून करण्यात आली.प्रमुख पाहुणे अॕड.श्री.भगवानजी बोकडे यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले ग्राहक हा नाडला जात आहे कारण तो संघटित नाही.म्हणूनच ग्राहक पंचायतने डोळसपणे समाजामध्ये विविध निवेदनाच्या माध्यमातून ग्राहकांमध्ये जाणीवजागृती व वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे.

            तालुका प्रमुख श्री.नरेश उराडे म्हणाले की,ग्राहक पंचायत गावागावात पोहचवून सदस्यसंख्या वाढविण्याच्या दृष्टिने सर्व सभासदांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.सर्वच क्षेत्रातील ग्राहकांच्या समस्या निवेदनाद्वारे कशा सोडविता येईल यावर सतत मंथन होणे आवश्यक आहे.

            अध्यक्ष श्री.विठ्ठल गांजरे म्हणाले की,तालुक्यातील महिलांच्या सभा घेऊन व शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लवकरच उद़्बोधन करून शोषित पीडीत ग्राहकामध्ये जागृती करण्यात येईल.     

         यावेळी अध्यक्ष विठ्ठलराव गांजरे, वरिष्ठ उपाध्यक्ष रघुनाथ पुंडे,उपाध्यक्ष वामनसिंग बागडी, सहसचिव ज्ञानेश्वर हुलके, संघटनमंत्री ईश्वरजी बरबटे,कार्याध्यक्ष श्याम खंडाळकर,कोषाध्यक्ष शकील शेख,तालुका प्रमुख नरेश उराडे,प्रसार प्रमुख सतिश साकोरे,विधी सल्लागार अॕड.भगवान बोकडे, सदस्य नानाजी मेंघरे,भारत खोब्रागडे,राजु रंधई, प्रविण खुबाळकर, दिलीप वंजारी, शेषराव कापसे ,नानाजी बावने,रमेश नान्हे,दिलीप वाळके, तुळशीदास प्रधान,अखाडू कनोजे,भास्कर कावळे,विनोद सोनकुसरे, अनुराग कोचर,इनायत सैयद, पप्पु बोथरा, चेतन गव्हाणे, व इतर सदस्य हजर होते.शेवटी उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष शकील मतिन शेख यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या