Advertisement

कन्हान - पिपरी नगर परिषद मध्ये सभापती पदांची बिनविरोध निवड |


कन्हान - पिपरी नगर परिषद मध्ये सभापती पदांची बिनविरोध निवड


कन्हान : -  कन्हान - पिपरी नगर परिषद मध्ये गुरुवार (दि.२९) जानेवारी रोजी विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली .


सर्व पदांसाठी एकमताने अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली . निवडणूक अधिकारी म्हणून दीपक घोडके यांनी कामकाज पाहिले , तर नगरपरिषद अध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली. गटनेते मनोज कुरडकर यांनी सभापती पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांचे अर्ज सादर केले.


या निवडणुकीत आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती पदी नगरपरिषद उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांची बिनविरोध निवड झाली . पाणीपुरवठा समितीच्या सभापती म्हणून सौ.आशा आकाश महोतो यांची निवड करण्यात आली . सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती पदी केतन भिवगडे यांची निवड झाली . महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून सौ. योगिता भलावी यांची , तर उपसभापती पदी सौ.प्रियंका लक्की ठाकूर (हटवार) यांची निवड करण्यात आली . तसेच नियोजन व विकास समितीच्या सभापती पदी श्री. प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

Kanhan-The-chairpersons-of-the-Pipri-Municipal-Council-were-elected-unopposed

या निवडणूक प्रक्रियेत भाजपा नागपुर जिल्हा (ग्रामीण) महामंत्री उदयसिंह (गज्जू) यादव , कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग , महामंत्री सचिन वासनिक , राजन विनयवार , सुरेंद्र बुधे , देवेंद्रसिंह सेंगर , कन्हान शहर अध्यक्ष महेंद्र साबरे , महामंत्री मयूर माटे , नगरसेवक विनोद किरपान , सुषमा चोपकर , पूनम राठी , चिंटू वाकुडकर , सुचित्रा माटे , प्रियंका बैस ठाकूर , शक्ती पात्रे , मोनिका पौनीकर , लक्की ठाकूर , आकाश महातो , अतुल गजभिये व सर्व नगरसेवक उपस्थित होते.


निवडणूक बिनविरोध पार पडल्याने नगरपरिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून , नव्याने निवडून आलेल्या सभापतींकडून शहराच्या विकासकामांना चालना मिळेल , अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .


सह संपादक - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या