कन्हान शहर विकास मंच द्वारे पत्रकार व युवा दिन थाटात साजरा
कन्हान : - कन्हान शहर विकास मंच च्या वतीने देशाच्या प्रथम महिला शिक्षिका थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर , राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून पत्रकार दिवस व युवा दिवस कार्यक्रम गांधी चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार एन.एस.मालवीय , प्रमुख अतिथि मंच मार्गदर्शक भरत सावळे , ज्येष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी , कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम राहाटे , शांताराम जळते , रामेश्वर शेंडे आदी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले , बाळशास्त्री जांभेकर , राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुणांचा डायरी, पेन, दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमात मान्यवरांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करतांना पत्रकार दिन व युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाची प्रस्तावना मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी मांडली . सूत्रसंचालन अर्जुन पात्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप बावने यांनी मानले . कार्यक्रमात पत्रकार बांधव , युवक - युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Journalists'-DaJournalists'-Day-and-Youth-Day-were-celebrated-with-great-fanfare-by-the-Kanhan-City-Development-Forum
-and-Youth-Day-were-celebrated-with-great-fanfare-by-the-Kanhan-City-Development-Forum
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , प्रदीप बावने , अर्जुन पात्रे , नाना ऊकेकर , रुपेश मेश्राम , मृणाल सरोजकर , यश शेंडे , नयन गायकवाड यांच्यासह महिला सदस्य अर्चना तांडेकर , मीना गिऱ्हे , सुषमा मस्के , ममता आष्टणकर , जयश्री गडपाडे , मीना कळंबे तसेच वेदांत कांमडे , प्रमोद गिऱ्हे , शुभम बावनकर , आयुष संतापे , हिमांशु सावरकर , निखिल मेश्राम , अभिषेक साखरे , रविंद्र कोच्चे , आकाश वांढणकर, माहेर इंचुलकर , अभय ऊके , रुजल मेश्राम , सुरज वरखडे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या