निवडणुकीत पराभव नंतर ही जनसेवेचा वसा कायम
प्रशांत मसार यांनी उठवला कन्हान मधील बेघर आणि दिव्यांगांचा आवाज
कन्हान : - राजकारणात अनेकदा पराभवानंतर नेते जनसंपर्कापासून दूर जातात , मात्र कन्हान-पिंपरी क्षेत्रातील प्रख्यात समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे . मगील १५ वर्षांपासून अविरत मानवसेवा करणारे प्रशांत मसार आज ही सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी खंबीरपणे उभे असल्याचे पाहायला मिळत आहे .
शनिवार (दि.१०) जानेवारी रोजी कन्हान - पिपरी नगर परिषद क्षेत्रातील बेघर , दिव्यांग , शोषित आणि पीडित कुटुंबांना 'घरकुल आवास योजनेत' त्वरित समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी प्रशांत मसार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नागपूर व मुख्य अधिकारी (CEO) जिल्हा नगर - परिषद कन्हान नागपूर यांना पारशिवनी तहसील येथे निवेदन सादर केले .
Even after the defeat in the election, the commitment to public service remains.
प्रमुख मागणी : शोषित आणि दिव्यांगांना मिळावा हक्काचा निवारा
प्रशांत मसार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले की , कन्हान-पिंपरी परिसरात असे अनेक दिव्यांग आणि गरीब कुटुंबे आहेत , जे आजही हक्काच्या घरापासून वंचित आहेत . कन्हान-पिंपरी परिसरातील बेघर कुटुंबांचा घरकुल योजनेत त्वरित समावेश करावा , दिव्यांग आणि समाजातील शोषित घटकांना प्राधान्याने घरांचे वाटप व्हावे , घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय दिरंगाई दूर करून पीडित कुटुंबांना न्याय द्यावा , असे निवेदनात नमुद केले आहे .
या शिष्टमंडळात प्रशांत मसार यांच्यासोबत प्रमुख सामाजिक कार्यकर्ते नितीन मेश्राम , गणेश भालेकर , सचिन यादव , उमेश यादव , अमोल वंजारी , पल्हाद पहाडे यांची प्रमुख उपस्थिती होती . पात्र लाभार्थ्यांना घराचा लाभ मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला .
"पद असो व नसो, जनसेवेचे व्रत थांबणार नाही . निवडणुकीत जय - पराजय ही लोकशाहीतील प्रक्रिया आहे , पण माझ्या भागातील कोणताही नागरिक बेघर राहू नये , ही माझी जबाबदारी आहे . प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी . प्रशांत बाजीराव मसार (समाजसेवक)
समाजसेवेचा १५ वर्षांचा अखंड प्रवास प्रशांत मसार हे नाव गेल्या १५ वर्षांपासून कन्हान परिसरात समाजसेवेसाठी ओळखले जाते . निवडणुकीत विजय मिळाला नसला तरी , आजही ते जनतेच्या सुख - दु:खात सहभागी होत असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. आजच्या या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळातही मसार यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या