विद्या हेच खरे धन ; उडान ग्रुपचा सामाजिक उपक्रम
कन्हान : - विद्या हेच खरे धन या संकल्पनेतून सहयोग उडान ग्रुप (एक हात मदतीचा) शाखा कन्हान यांच्या वतीने शनिवार (दि.१७) रोजी सार्वजनिक वाचनालय , हनुमान नगर , कन्हान येथे मार्गदर्शनपर सभेचे आयोजन करण्यात आले .
Education is the true wealth; a social initiative by Udan Group.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली . या सभेत सहयोग महिला बचत गट (SMBG) , आरडी , एफडी , एमआयएस , डीएएम , कासा , तसेच आरोग्य व जीवन विमा योजनांबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली . विविध प्रकारच्या खात्यांबाबत बचत , गुंतवणूक व कर्ज योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले .
उडान ग्रुपच्या वतीने वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एमपीएससी , यूपीएससी , रेल्वे व पोलीस भरती आदी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके , रजिस्टर व पेनचे वितरण करण्यात आले . विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले .
या कार्यक्रमास शाखा व्यवस्थापक अतुल सरोदे , सहाय्यक शाखा व्यवस्थापक शुभांगी राऊत , वाचनालयाचे अध्यक्ष व सदस्य , कन्हान शाखेचे बीडीओ , बीडीई , स्वयंसेवक , स्वयंसेविका तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बावने यांनी केले . सदर उपक्रमास वाचनालयातील कर्मचारी , विद्यार्थी व नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला . शिक्षणासोबतच आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या उडान ग्रुपच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले .
सह संपादक - ऋषभ बावनकर


0 टिप्पण्या